सावदा पालिकेत शिवसेनेचे डफ वाजून दोन तास ठिय्या आंदोलन
सावदा पालिकेत शिवसेनेचे डफ वाजून दोन तास ठिय्या आंदोलन
शौचालयावर आक्षेपार्ह चित्र रेखाटनाराऱ्या पालिका अधिकाऱ्यावर गुन्हा नोंद करा
प्रतिनिधी सावदा :- शहरातील पालिकेच्या शौचालयाच्या भिंतीवर भावना दुखावणारे चित्र रेखाटल्याने मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेने दोन दिवसांपूर्वी एका निवेदनाद्वारे केली होती. यासाठी त्यांनी पोलिस ठाण्यात व प्रांत कार्यलयात निवेदन दिले होते. या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल न केल्याने शिवसेना,भाजपा व नागरिक यांनी पालिकेच्या पोर्च मध्ये डफ वाजवून दोन तास बसून धार्मिक भावना दुखावल्या असल्याने दोषींवर गुन्हा दाखल करा,
या मागणी साठी ठिय्या आंदोलन सोमवार सकाळी ११ वाजता सुरू केले. आंदोलन विरीष्ठ अधिकारी प्रशासक आल्या शिवाय आंदोलन थांबवणार नाही अस पवित्रा घेतल्याने दुपारी १ वाजता प्रशासक तथा प्रांत अधिकारी कैलास कडलग आल्या नंतर दोन दिवसात चौकशी करून कार्यवाही करू असे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
नगरपालिका हद्दीतील पाताळगंगा या नैसर्गिक नाल्याच्या काठावरील (वॉर्ड क्रमांक ७) महिलांच्या सार्वजनिक शौचालयाच्या दर्शनी भागातील भिंतीवर कलर पेंटिंग केले होते. या रेखाटनात मात्र, तीनपैकी एका चित्रात 'ठेवा साफसफाई घरात, हेच औषध सर्व रोगात, "स्वच्छ सावदा सुंदर सावदा "असे लिहिलेल्या दोन घोष वाक्यांदरम्यान ३ पुरुषांसोबत एका महिलेच्या डोक्यावर तुलसी कुंड व त्यावर स्वस्तिक रेखाटले आहे. यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे यास जबाबदार असलेले अधिकारी, ठेकेदार व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी.
थेट गुन्हे दाखल करावे. अश्या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या मार्फत पोलीस ठाण्यात दिले होते. त्याची पूर्तता न झाल्याने , अन्यथा सोमवारी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने दिला होता. त्या मागणी ला अनुसरून शिवसेना व नागरिकांनी पालिकेत डफ वाजवत दोन तास ठिय्या आंदोलन केले. या वेळी प्रशासक तथा प्रांत अधिकारी कैलास कडगल यांनी आंदोलन कर्त्याना दोन दिवसात चौकशी करून योग्य ती कार्यवाही करू असे लेखी आश्वासन दिले. यावेळी सपोनि डी.डी. इंगोले,पालिका प्रशासनाचे ओ.एस. सचिन चोळके, करनिरीक्षक अनिल आहुजा सह आंदोलन करणारे शिवसेना शहरप्रमुख सुरज परदेशी व भरत नेहते, शिवसेना उपतालुका प्रमुख धनंजय चौधरी, मिलिंद पाटील ,युवासेने प्रमुख मनीष भंगाळे ,भाजपा शर प्रमुख जे. के.भारंबे,संघटक महेश अकोले,भाजप व्यापारी आघाडी गजानन भार्गव,संतोष परदेशी, युवासेनेचे राकेश बोराखडे ,गणेश माळी, चेतन माळी, मंगेश माळी, नितीन सपकाळे ,बंटी लोखंडे शुभम चौधरी, प्रतीक कोल्हे ,भैय्या चौधरी ,वेडु लोखंडे, ईश्वर नेमाडे, किशोर नेमाडे, अभिजित मिटकर, स्वप्नील परदेशी, योगेश कुरकुरे, भाऊ धांडे ,विजय पाटील,गणेश देवकर ,नाजिम शेख, शाहरुख तडवी, हुसेन शेख, इरफान मिया ,किरण गुरव ,पवन भोरटक्के, यश चौधरी सुमित खाचणे, गौरव भैरवा, स्वप्नील महाजन सर्व धर्मीय नागरिक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत