रायपूरच्या तरुणाचा नेपानगरातील नाल्यात पुरलेला मृतदेह दोघांनी पोलिसांना दिली खुनाची कबुली
(भिकन परदेशी) (विठ्ठल परदेशी)
रायपूरच्या तरुणाचा नेपानगरातील नाल्यात पुरलेला मृतदेह -
दोघांनी पोलिसांना दिली खुनाची कबुली
लेवाजगत न्यूज जळगाव-तालुक्यातील रायपूर येथून १७ एप्रिलपासून बेपत्ता असलेल्या भूषण जयराम तळेले ( वय ३४ ) यांचा खून झाल्याचे बुधवारी निदर्शनास आले . त्यानंतर गुरुवारी मध्यप्र देशातील नेपानगरातील जंगलात नाल्यात पुरलेला तळेले यांचा मृतदेह एमआयडीसी पोलिसांनी बाहेर काढला .
या खुनाचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे . . दरम्यान , खून केल्याची कबुली अटकेतील भिकन श्यामसिंग परदेशी व विठ्ठल प्रेमसिंग परदेशी या दोघांनी दिली . भूषणची ओळख परिसरात राहणाऱ्या भिकन व विठ्ठल यांच्यासोबत होती .
चटइंच्या कंपनीत काम करणाऱ्या भूषणला नवीन काम मिळवून देण्याचा बहाणा करून भिकन व विठ्ठल हे दोघे १७ एप्रिल रोजी भुसावळला घेऊन गेले . तेथे दारू प्यायले . त्यानंतर मुक्ताईनगर येथे जाऊन पुन्हा दारू प्यायले दुपारी ४ वाजता ते नेपानगर परिसरातील एका जंगलात पोहोचले होते . तेथे दोघांनी भूषणच्या गुप्तांगावर मारहाण केली . दोरीने गळा आवळून त्याचा खून केला व मृतदेह दोघांनी एका नाल्यात पुरलात्यानंतर दोघेजण भूषणची दुचाकी घेऊन पुन्हा रायपूर येथे आले. भूषणची पत्नी आशाला भिकन वेगवेगळ्या लोकांकडून फोन करून तो पुण्यात , गुजरात , भुसावळ येथे पाहिल्याचे सांगत राहिला . आशा यांनी पोलिसांना गळ घातल्यानंतर उपनिरीक्षक अनिस शेख , गफूर तडवी , सिद्धेश्वर डापकर , सुधीर साळवे यांच्या पथकाने भिकन व विठ्ठल यांना चौकशीसाठी बोलावून घेतले तेव्हा घटनेचे बिंग फुटले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत