Header Ads

Header ADS

अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी, पुण्यातील दोन भाविकांचा मृत्यू

 


अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी, पुण्यातील दोन भाविकांचा मृत्यू 

लेवाजगत न्युज:-अमरनाथ यात्रे दरम्यान ढगफुटीची घटना घडली होती. या ढगफुटीच्या घटनेतून यात्रेकरू सुरक्षितरित्या घरी आले. मात्र त्यात पिंपरी येथील एक यात्रेकरू होता. यात्रेवरून खाली आल्यानंतर त्या यात्रेकरूला हृदयविकाराचा झटका आला. 

 मात्र उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. त्यामुळे पुण्यात 1 आणि पिंपरीमधील 1 अशा दोन यात्रेकरूंचा मृत्यू पुण्यातून झाला असल्याची माहिती समोर आली आहे. प्रदीप नाथा खराडे असे मृत झालेल्या यात्रेकरुचे नाव असून त्यांनी गजानन महाराज खेडेकर यांनी काढलेल्या अमरनाथ यात्रेत प्रदीप खराडे यांचा समावेश होता. अमरनाथ दर्शन घेऊन आल्यानंतर खराडे यांना हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.  

 प्रदिप खराडे यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून पुण्याकडे रवाना करण्यात आला असल्याची माहिती शुभम खेडकर यांनी दिली आहे.

याशिवाय खेडेकर यांच्यासोबत गेलेले आणखी दुसरे भाविक सुखरूप असून ते सध्या बलताल बेस कॅम्प येथे सुखरूप आहेत. उद्या म्हणजे १० जुलै रोजी त्यांचा परतीचा प्रवास सुरु होणार आहे.

   अमरनाथ येथे यात्रेसाठी जाणाऱ्या नागरिकांनी खासगी कंपनीच्या चार बस केल्या होत्या अशी माहिती समोर येत आहे. यात्रेकरू आणि व्यवस्थापक मिळून एकूण २०० यात्रेकरू अमरनाथ साठी गेले होते.

तसेच गजानन महाराज सोबत जाणाऱ्या यात्रेकरूंनी माऊली यात्रा कंपनीची खासगी बस केली होती. त्यात ५५ जण यात्रेसाठी गेले आहेत. यात ५५ पैकी २० जण बालताण पार्किंग तंबूत सुरक्षित आहेत तर ३५ पैकी ३४ यात्रेकरु मिलिटरी कॅम्पमध्ये सुरक्षित असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये पुण्यातील वडगाव बु येथे राहणाऱ्या सुनीता भोसले यांचा मृत्यू झाला असून त्यांचा मृतदेह जम्मू येथे हेलिकॉप्टरने नेण्यात आले असून त्यांच्या सोबत पती महेश भोसले आणि नणंद प्रेमा शिंदे यादेखील आहेत. 

 ढगफुटी झाल्यानंतर प्रशासनाकडून अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली असून यात्रेकरूना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.