सावदा येथील स्वामीनारायण गुरुकुल मध्ये अवतरली माऊलीची पंढरपूर वारी ज्ञानोबा माऊली तुकाराम ,जय स्वामीनारायण विद्यार्थ्यांनी केला जयघोष
सावदा येथील स्वामीनारायण गुरुकुल मध्ये अवतरली माऊलीची पंढरपूर वारी
ज्ञानोबा माऊली तुकाराम ,जय स्वामीनारायण विद्यार्थ्यांनी केला जयघोष
लेवाजगत न्यूज सावदा -येथील स्वामीनारायण गुरुकुल येथे आषाढी एकादशीच्या पंढरपूर वारी निमित्त आज सकाळी आठ वाजता विद्यार्थ्यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. शिस्तबद्ध आणि उत्साह पूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांनी भारुडे, नाटके, भजने ,कीर्तन असे सादरीकरण जवळजवळ तीन तास केले. गुरुकुल परिसरात यामुळे अध्यात्मिक स्वरूप पंढरपूर वारीचे आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्वामीनारायण गुरुकुलचे उपाध्यक्ष भक्ती किशोर दाजी साहित्यिक व .पु .होले, ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्याम पाटील, शास्त्री अनंत प्रकाश, शास्त्री सत्यप्रकाश स्वामी, दीपक भगत ,स्वामीनारायण गुरुकुल च्या संचालक पी. डी. पाटील मुख्याध्यापक संजय वाघुळदे व विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला
यावेळी विविध संत महंतांची वेशभूषा साकारली होती. यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष भक्ती किशोर दाजी म्हणाले की पंढरपूरच्या वारीचा हा आनंद प्रत्येक विद्यार्थ्यांनी भरभरून घेतला अशाच अध्यात्मिक कार्यक्रमात सहभाग घेतल्याने यातूनच मोठ्या पडद्यावर येण्याचे भाग्य लागू शकते असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रमुख पाहुणे साहित्यिक व. पु. होले यांनी सांगितले की भारुड, नाटक, कीर्तन हे फक्त करमणूक नाही तर त्यात फार मोठा संदेश होता. या विद्यार्थी विद्यार्थिनीं यांनी सादरीकरण केलेल्या वारीमधील प्रत्येक घटनेत अध्यात्मिक महत्त्व आहे ते महत्त्व समजून घ्यायचे आहे, त्यात साकारण्यात आलेल्या घटना सर्वांनी समजून घेतले पाहिजे. याद्वारे आपल्या पुढच्या पिढीला संतमंतांचे महत्त्व कळत राहणार आहे. सर्व ग्रंथ हे आपल्या सर्व येणाऱ्या पिढ्यांसाठी महत्त्वाचे आहे. यातील संस्कार पुढे नेण्याची जबाबदारी सर्वांची आहे.सर्व जग या ग्रंथांचा अभ्यास करतात आपणही त्याचे महत्त्व आपल्या पुढच्या पिठींना सांगितले पाहिजे आणि ते पुढच्या पिढीसाठी या अशा कार्यक्रमातून स्वामीनारायण गुरुकुल विद्यार्थ्यांच्या समोर मांडीत असते हेच एक महत्त्वपूर्ण आपल्यासाठी आहे असे मत होले यांनी मांडले.
या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी घेतला सहभाग
(अभंग,हरिपाठ,विरहण्या,भारुळ, गौळण,पसायदान)
मुकेश बाऊसकर, ऋतुजा नितीन चौधरी,राधिका किशोर जंजाळकर,तेजस योगेश महाजन,हेमांगी पाटील,नाटिका मानसी रावसाहेब पाटील,एकांकिका हर्षदा जितेंद्र नेमाडे,भाग्येश सरोदे,इशांत पाटील,भार्गव भामरे,तेजस पाटील,खिलेश कोल्हे,सर्वेश चौधरी,अथर्व सोपान महाजन,यदुनाथ जंजाळकर,धीरज सचिन नेहते,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत