डोळ्यात मिरचीपूड फेकून सोने कारागिराला तीन चोरट्यांनी लुटले
डोळ्यात मिरचीपूड फेकून सोने कारागिराला तीन चोरट्यांनी लुटले
लेवाजगत न्यूज जळगाव- तीन चोरट्यांनी एका सोने कारागिराच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून त्याचा मोबाइल व पैसे लुटले शुक्रवारी रात्री शिवाजीनगर स्मशानभूमीजवळ ही घटना घडली. शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश परमानंद सोनी ( वय ४३ ,रा.महावीरनगर ) यांची लूट झाली आहे.
घटना अशी की , सोनी हे सराफ बाजारात एका दुकानावर सोन्याचे दागिने घडवण्याचे काम करतात. शुक्रवारी रात्री ते दुकानबंद करून घराकडे निघाले होते. यावेळी शिवाजीनगर स्मशानभूमीजवळील निर्मनुष्य ठिकाणी दुचाकीवरून आलेल्या एका भामट्याने त्यांना अडवले. लागलीच आणखी दोन भामटे तेथे आले. तीनही भामट्यांनी सोनी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. एकाने त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकली. यामुळे सोनी यांच्या डोळ्यात जळजळ झाल्याने ते प्रतिकार करू शकले नाही. ही संधी साधून भामट्यांनी त्यांचा २० हजार रुपयांचा मोबाइल , दोन हजार रुपयांची रोकड , लेदरचीखून आणि दरोड्याचा स्पॉट शिवाजीनगर स्मशानभूमीजवळ पथदिवे नाहीत. शिवाय स्मशानभूमी असल्यामुळे रात्री या मार्गावर लोकांची वर्दळ नसते. अवघ्या २०० मीटर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात लुटीच्या घटना घडत आहेत. माजी महापौर अशोक सपकाळे यांच्या मुलाचा खूनदेखील याच भागात झाला आहे. खून , दरोड्यांचा स्पॉट म्हणून हा भाग आता ओळखला जातो आहे. पथदिवे नसल्यामुळे या भागात रात्रीच्या वेळी अनेक भामटे , टवाळखोर मद्यपान करत असतात. शेजारी रूळ असल्यामुळे त्यांना पळून जाण्यास फावते. पिशवी व दुकानाच्या चाव्या घेऊन पळ काढला. सोनी यांनी घटनास्थळावरूनच शहर पोलिस ठाण्यात फोन करून माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन चौकशी केली. तोपर्यंत भामटे पसार झाले होते. याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी तपास करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत