Header Ads

Header ADS

खिरोदा - जवळ रिक्षा पालटली १ ठार १ जखमी

 खिरोदा - जवळ रिक्षा पालटली १ ठार १ जखमी 

सावदा प्रतिनिधी लेवाजगत न्युज - सावदा येथून सुमारे १२ किलोमीटर  दूर असलेल्या खिरोदा - पाल रस्त्यावर पाल कडून खिरोदा मार्गे फैजपूर येथे जाणारी अँपे रिक्षा क्रमांक( एम एच १९ सी डब्लू ०९८० ) ही दिनांक ९  रोजी सायंकाळी ७ वाजता खिरोदा जवळ असलेल्या   भिलट बाबा मंदिराचे पुढे नाल्यात पलटी झाल्याने एक जण ठार तर १ जण गंभीर जखमी झाला आहे.

         सावदा पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी रवाना झाले जखमीला तातडीने भुसावळ येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले. 

यात विकास लक्ष्मण कपले रा. फैजपूर येथील व्यक्तीचा मृत्यू झाला तर मनोहर मधुकर   मंडवाले राहणार फैजपूर हा  गंभीर जखमी झाला आहे. जे, सी , बी च्या साह्याने रिक्षा बाहेर काढण्यात आली, यावेळी पो.हे.कॉ जयराम खोडपे, पो,हे,कॉ युसूफ तडवी, मेहरबान तडवी, संजय तडवी, देवेंद्र  पाटील यांनी तातडीने मदत केली या प्रकरणी सावदा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.