Header Ads

Header ADS

एकमेकांना मदत करून लेवा समाज प्रगत करा-बदलापूर येथे लेवापटीदार मेळाव्यात मान्यवरांचे सूर

 

एकमेकांना मदत करून लेवा समाज प्रगत करा-बदलापूर येथे लेवापटीदार मेळाव्यात मान्यवरांचे सूर

एकमेकांना मदत करून लेवा समाज प्रगत करा-बदलापूर येथे लेवापटीदार मेळाव्यात मान्यवरांचे सूर 

लेवाजगत न्यूज बदलापूर-  बदलापूर येथील लेवा पाटीदार समाजातील तरुण पिढी एकत्र यावी आणि समाजाच्या सर्व घटकांचा विकास व्हावा या उद्देशाने समाजाची सर्व तरुण मित्र मंडळ एकत्र  आणून एक छोटेखानी समाज  एकत्रि कारणाचा कार्यक्रम मान्यवरलेवा पाटीदार समाज बांधवांच्या उपस्थितीत मेळावा एरंजड येथील झोपे फार्म हाऊस येथे  घेण्यात आला .या वेळी समाजाची पुढील रूप रेषा ठरवण्यात आली.एकमेकांना मदत व सहकार्य करून समाज प्रगती पथावर नेण्याचे काम सर्वांनी करावे असे आवाहन उपस्थित लेवा पाटीदार समाज बांधवांना केले.

Lewajagat


कार्यक्रमास बदलापूर लेवा पाटीदार समाज मंडळाचे अध्यक्ष  गेंदा वामन पाटील,सचिव पियूष नीलकंठ पाटील मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक  रामदास पाटील 

यांनी तरुण पिढीला आणि उपस्थितांनामोलाचे  मार्गदर्शन केले.

लेवाजगत


     उपस्थित लेवा पाटीदार समाजातील उच्च शिक्षित डॉ पंकज भंगाळे,डॉ राहुल पाटील,डॉ हर्षल पाटील, डॉ चेतन महाजन  डॉ अशोक पाटील, डॉ , भूषण कोल्हे यांनी आपले मनोगत समाज बांधवांना आजार बाबद काही समस्या असल्यास सोडवण्याचे व मदतीचे आश्वासन दिले व आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन विकास रघुनाथ फिरके यांनी केले  व मंडळाचे संचालक सोपानदेव रघुनाथ धांडे यांच्या तर्फे स्नेह भोजनाचा कार्यक्रम पार पडला.

     कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हितेश किशोर भोळे, किरण बोंडे,मनोज चौधरी,अमर पाटील (खान्देश एंटरप्राइजेस)मयूर पाटील , मयूर भोळे ,जितेंद्र लढे , हितेंद्र झांबरे , गौरव इंगळे , तुषार चौधरी , उमेश पाटील , मोहन चौधरी , निकेतन भोळे, अमोल पाटील, जितेश सरोदे इ. यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी पार पाडला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.