Header Ads

Header ADS

आमोदा ग्रामपंचायत , श्रीराम दूध उत्पादक संस्था व यावल पशुवैद्यकीय वैद्यकीय अधिकारी यांच्या सहकार्याने लंपी रोगावर पशुधनांना मोफत लसीकरण.

आमोदा ग्रामपंचायत , श्रीराम दूध उत्पादक संस्था व यावल पशुवैद्यकीय वैद्यकीय अधिकारी यांच्या सहकार्याने लंपी रोगावर पशुधनांना मोफत लसीकरण..


आमोदा ग्रामपंचायत , श्रीराम दूध उत्पादक संस्था व यावल पशुवैद्यकीय वैद्यकीय अधिकारी यांच्या सहकार्याने लंपी रोगावर पशुधनांना मोफत लसीकरण

लेवाजगत न्यूज आमोदा ता यावल---  सध्या पशुधनांवर होत असलेला लंपी स्किन ह्या आजाराने परिसरात थैमान घातले आहे.ह्या रोगाचा संसर्ग थांबावा म्हणून गावातील पशुपालक यांच्या मागणी नुसार ग्रामसभेत ठराव संमत करून ग्रामपंचायत आमोदे व श्रीराम दूध उत्पादन संस्था यांच्या  मार्फत आज दिनांक १०/०८/२०२२ रोजी मोफत लसीकरण शिबिर घेण्यात आले.



               या शिबिराला गावातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला गावातील व गावाजवळील जनावरे जिथे बांधलेली असतात तिथे जाऊन लस देण्यात आली. गावातील जवळ जवळ ९५% जनावरांना लस देण्यात आली.

              यावेळी आमोदा  विविध कार्यकारी सहकारी सोसायटी यांनी सभागृह उपलब्ध करून दिला. या प्रसंगी यावल तालुका पशुवैद्यकीय अधिकारी  डॉ. बढे ,डॉ.इंगळे व तालुक्यातील सर्व पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी लसीकरण उत्तम प्रकारे पूर्ण केले तसेच कार्यक्रम पसंगी ग्रामविकास अधिकारी डी. डी. पाटील , सरपंच हसीना फकिरा तडवी ,सदस्य राजेंन्द पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी, दूध उत्पादक संस्था चेअरमन राजेंद्र चौधरी ,व्हाईस चेअरमन गोलू लोखंडे, सदस्य व कर्मचारी ,  पोलीस पाटील तुषार चौधरी सर्व पशुपालक उपस्थित होते. या लसीकरणासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन चौधरी ,सामाजिक कार्यकर्ते प्रमोद वाघूळदे,वसंत पाटील ,प्रसाद चौधरी ,गुणवंत पाटील ,  अल्लाउद्दीन तडवी , मनोज बैरागी , सचिन चौधरी , खेमचंद लोखंडे या सर्वांचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.