Header Ads

Header ADS

आमोदा येथे विश्व आदिवासी गौरव दिन साजरा




आमोदा येथे विश्व आदिवासी गौरव दिन साजरा


आमोदा येथे विश्व आदिवासी गौरव दिन साजरा

लेवाजगत  न्यूज आमोदा ता यावल-ग्रामपंचायत कार्यालय आमोदे येथे 9 ऑगस्ट रोजी विश्व आदिवासी दिन साजरा करण्यात आला

            आपल्या समाजासाठी प्राणाची आहूती देणाऱ्या शहीद क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आदिवासी समुदाय हा अती प्राचीन मूळ भारतीय समाज आहे एकेकाळी भारतीय जल ,जंगल जमिनीचा मालक असणारा हा समाज इंग्रजांच्या आर्थिक शोषणामुळे दुर्लभ बनला हा समाज देशाच्या नव्हे तर जगाच्या पाठीवर आजही निसर्गाची पुजारी मानला जातो



              खानदेश महाराष्ट्रातील आदिवासी समुदायाचे अनोखे वैशिष्ट्य आहे असे म्हटले जाते ब्रिटिशांना त्यांच्या जंगलातून उत्पन्न वाढवण्यासाठी साग हवा होता त्यामुळे त्यांनी फॉरेस्ट खाते तयार केले आणि या लोकांना आपल्या हक्कात हक्क नाकारला त्यांना त्रास दिला पण शहीद क्रांतिवीर बिरसा मुंडा, राघोजी भांगरे व इतर आपली आदिवासी समाजाने प्राणाची आहुती दिली

               अशा या आहूती देणाऱ्या क्रांतिकारांची पूजन आमोदा ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले त्याप्रसंगी सरपंच हसीना तडवी ग्रामपंचायत सदस्य मनीषा चौधरी ,जुगराबी तडवी , प्रमिला पाटील , राजेंद्र पाटील , गौतम तायडे ,संजू तडवी शरीफ तडवी, टीना चौधरी तसेच गावातील आदिवासी समाजाचे तरुण मंडळी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.