Header Ads

Header ADS

सावदा येथील कुंभारवाडा येथे जगदंब गृप ने आझादी का अमृत महोत्सव केला साजरा

 

सावदा येथील कुंभारवाडा येथे जगदंब गृप ने आझादी का अमृत महोत्सव केला साजरा


सावदा येथील कुंभारवाडा येथे जगदंब गृप ने आझादी का अमृत महोत्सव केला साजरा 

लेवाजगत न्यूज सावदा- कुंभारवाडा येथे भारताच्या  ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम जय जगदंब ग्रुप तर्फे आयोजित करण्यात आला होता उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.

    या वेळी परिसरातील सर्व ज्येष्ठ तसेच युवा वर्ग उपस्थित होता पाऊस सुरू असून सुद्धा  मुलांचा उत्साह आणि देशाबद्दल असलेले प्रेम कौतुकास्पद होते. या प्रसंगी  मान्यवरांच्या हस्ते भारत माता प्रतिमा पूजन करण्यात आले.कार्यक्रम प्रसंगी परिसरातील चिमुकल्यांना खाऊ वाटपाचा करण्यात आला.यावेळी परिसरातील मान्यवर वसंत दशरथ महाजन,डॉ.भूषण दिलीप महाजन,अमित दत्तात्रय महाजन,भूषण वसंत महाजन,रुपेश मधुकर कुंभार,लक्ष्मण कुंभार,चंद्रकांत कुंभार, सुहास वसंत महाजन,केशव कुंभार,विजय कुंभार,प्रल्हाद कुंभार,सुनील कुंभार,भीमा कुंभार परिसरातील  सर्व ज्येष्ठ आणि तरुण मंडळींचे मार्गदर्शना खाली कार्यक्रम पार पाडण्यात आला,कार्यक्रमास एकता गणेश मित्र मंडळ आणि एकता दुर्गोस्त्व मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

कुंभारवाडा परिसरातील जय जगदंब ग्रुप याच्या सदस्य हे लहान मुले असल्याने  कमी वयात एवढा अतिशय सुंदर आणि कौतुकास्पद कार्यक्रम आयोजित केला परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.