फैजपुरात बारा गाड्या जल्लोषात व शांततेत संपन्न
फैजपुरात बारा गाड्या जल्लोषात व शांततेत संपन्न
लेवाजगत न्यूज फैजपूर-येथील दक्षिण बाहेरपेठ भागातील पुरातन काळातील मरी मातेचे जागृत देवस्थान असून श्रावण महिन्यात श्रावण शुक्ल १३,दिनांक ९ ऑगस्ट २०२२ मंगळवार या दिवशी बारा गाड्या भगत संजय सेवकराम कोल्हे यांच्या हस्ते ओढण्याची ही परंपरा सुरू ठेवली आहे. दुपारी ३ वाजता भगताची शहराच्या प्रमुख मार्गावरून नवरत्न मिरवणूक काढण्यात आली . संध्याकाळी अंकलेश्वर बऱ्हाणपूर रोडवर मुन्सिपल हायस्कूल पासून बारा गाड्या सुभाष चौकापर्यंत ओढण्यात आल्या . यावेळी भाविक भक्तांनी रस्त्यावर दुतर्फा गर्दी करून, दाखल होत कार्यक्रमाचा आनंद घेतला. पूर्वीपेक्षा यावर्षी बारा गाड्या पाहण्यासाठी गर्दी कमी होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांचे मार्गदर्शनाखाली मोहन लोखंडे, अमजद खान पठाण, राजू बरहाते, किरण चाटे, रवींद्र मोरे सर्व पोलीस टॉप यांनी चोख बंदोबस्त ठेवला. बारा गाड्या ओढण्याचा मध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाही शांततेत संपन्न झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत