सावदा येथील अंगणवाडीत स्वात्रंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा
सावदा येथील अंगणवाडीत स्वात्रंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा
लेवाजगत न्यूज सावदा -येथील अंगणवाडी मध्ये स्वात्रंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त चिमुकल्या बालकांनी भारतमाता, सावित्रीबाई फुले,पोलीस, सैनिक, राणी लक्ष्मीबाई, परी,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अंगावर तिरंगाध्वज धारण केलेल्या विविध वेषभूषा करून प्लॉट एरिया,तडवीवाड्यातून विद्यार्थी व माता पालक मिळून अंगणवाडी सेविका ज्योती सापकर यांनी घोषणा देत रॅली काढली.
रॅलीत माजी उपनगराध्यक्षा शबाना तडवी,आशा तडवी व परिसरातील माताभगिनी सहभागी झाल्या.
रॅली नंतर माजी उपनगराध्यक्षा शबाना तडवी यांनी बालकांना गुलाबपुष्प देवून त्यांचे स्वागत केले व नवयुवक राजेश पाटील ,गौरव वानखेडे,बंटी लोखंडे यांच्या वतीने बिस्कीट पुड्यांचे वाटप करण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत