केंद्राच्या स्किल इंडिया,स्टार्टअप इंडियाचा तरुणांना फायदा घ्यावा -शरद महाजन फैजपूर येथे जेटीएम आय टी आय मध्ये पदवीदान समारंभ उत्साहात
केंद्राच्या स्किल इंडिया,स्टार्टअप इंडियाचा तरुणांना फायदा घ्यावा -शरद महाजन
फैजपूर येथे जेटीएम आय टी आय मध्ये पदवीदान समारंभ उत्साहात
लेवाजगत न्यूज न्हावी- तालुका यावल येथील तंत्र व वैद्यक मंडळ संचलित जे टी महाजन आय टी आय मध्ये पास झालेल्या झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा पदवीदान समारंभ पार पडला.
तरुणांना प्रेरणा देण्यासाठी देशाचे पंतरप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हा प्रशिक्षणार्थ्यांचा पदवीदान समारंभ आजपर्यंत प्रथमच घेण्याचा अनोखा कार्यक्रम असून ,केंद्र शासनाच्या स्किल इंडिया,स्टार्टअप इंडिया अंतर्गत तरुणांना चांगली संधी चालून आली असुन याचा आपण फायदा घेऊन आपले आयुष्य उज्वल करावे,आपणाकडे कौशल्य असणे महत्वाचे आहे ही कौशल्य परिसराच्या माध्यमातून,संपर्काच्या माध्यमातून ,पुस्तकी ज्ञानाच्या माध्यमातून, प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून,ओबझर्वेशनच्या माध्यमातून व आज आपल्या सतत हातात असणाऱ्या मोबाईलच्या माध्यमातून आपण आपले कौशल्य वाढवून , प्रामाणिकपणा ठेऊन व विचारांची देवाण घेवाण करून तुम्ही चांगले उद्योजक होऊ शकता असे कार्यक्रमाचे अध्यक्ष शरद महाजन यांनी व्यक्त केले.
सन 2020 -2022 प्रवेशित तसेच उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी आय टी आय मध्ये पदवीदान समारंभ घेण्याचे निर्देश डी जी टी नवी दिल्ली यांच्या पत्राद्वारे करण्यात आला, सदर कार्यक्रमास तंत्र व वैद्यक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद महाजन हे अध्यक्ष व जे टी महाजन पोलिटेक्निकलचे प्राचार्य पी एम राणे हे प्रमुख अतिथी हेते,
आय टी आय पास झाल्यानंतर पुढील वाटचालीचे मार्गदर्शन जे टी महाजन आय टी आय चे प्राचार्य पी के फालक यांनी केले,
अध्यक्ष शरद महाजन , प्रमुख पाहुणे व प्राचार्य पी के फालक यांच्या हस्ते पदवीदान करण्यात असले.तसेच आलेल्या पालक दिलीप नेहेते,रुबाब तडवी,कुमार पाटील व सतीश मेढे यांचे स्वागत शरद महाजन यांच्या हस्ते करण्यात आले।
इलेक्ट्रिशियन विभातून
1) वेदांत कैलास पाटील 81.54%
2)यश सतीश मेढे 80.62%
3) गणेश रमेश इंगळे 77.23%
फिटर
1) निखील विष्णू पाटील 70.15%
2) अमित हेमंत महाजन 76.23%
3) विवेक प्रकाश इंगळे 74.08%
मोटार मेकॅनिक
1) तन्वीर बाबूलाल पिंजारी 74.69%
2) शेख आदिल शेख सलीम 71.31%
3) मोहम्मद सोईल शेख हमीद 70.08%
वेल्डर
1) सिद्धेश दिलीप नेहेते 74.5%
2) आकाश ज्ञानेश्वर मालखेडे 74.5%
3) विनोद राजेंद्र पाटील 73.67%
जे टी महाजन आय टी आय चे शिक्षक पी के चौधरी यांनी सूत्रसंचालन केले तर एम एस भिरुड यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत