Contact Banner

फैजपूर येथे धनाजी नाना महाविद्यालयात प्राचार्य सहविचार सभा उत्साहात

 

Faizpur-here-Dhanaji-Nana- in-college-principal-sahavichar-meeting-enthusiasm

फैजपूर येथे धनाजी नाना महाविद्यालयात प्राचार्य सहविचार सभा उत्साहात 

लेवाजगत न्यूज फैजपूर-येथील धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालय  येथे यावल-रावेर तालुक्यातील प्राचार्य/मुख्याध्यापक यांच्या सहविचार सभेचे आयोजन

 शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३च्या फेब्रुवारी/मार्च २०२३ मध्ये होऊ घातलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र आणि उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या आवेदन पत्र भरणेबाबतच्या सूचना, मार्गदर्शन व मंडळाच्या कार्यवाहीबाबतचा यावल व रावेर तालुकास्तरीय सहविचार सभेचे फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते.

      सदर सभेस नाशिक विभागीय सहसचिव आदरणीय,डॉ.राहुल चौधरी साहेब व सहाय्यक सहसचिव श्रीमती.मंदाकिनी देवकर  मॅडम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.त्यांच्यासोबत आलेलेश्री.के.टी.नागपुरे (वरिष्ठ लिपिक) श्री.के.एफ.वसावे (कनिष्ठ लिपिक) सुद्धा उपस्थित होते.

सदर सभेत आगामी परीक्षेचे आवेदन पत्र भरतांना विद्यार्थ्यांचे नाव,जन्मतारीख,जात ,विषय, विषय कोड इ.गोष्टी आवेदन पत्र भरतांना होणाऱ्या चुका कशा टाळता येऊ शकतील  यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.सदरहू सभेत,जळगांव जिल्हा ज्युक्टो संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.नंदन वळींकार व श्री.के.टी. तळेले(मुख्याध्यापक)यांनी आवेदन पत्र भरतांना येणाऱ्या अडचणींच्या संदर्भात सविस्तर चर्चा करून काही मुद्द्यांमध्ये दुरुस्ती करून नाशिक बोर्डाच्या स्तरावरून आदेश काढावा अशी विनंती करण्यात आली.सदरहू कार्यक्रमास कॉलेजचे प्राचार्य डॉ. पी.आर्..चौधरी,मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष श्री.जयंत चौधरी,श्री.बाळू पाटील,श्री.व्ही.जी.तेली.प्रा.राजेश बडगुजर(उपाध्यक्ष)श्री.एन.व्ही.पाटील(बलवाडी) तसेच यावल व रावेर तालुक्याचे सन्माननीय प्राचार्य/मुख्याध्यापक/उपप्राचार्य बंधू-भगिनींची उपस्थिती होती.सूत्रसंचालन प्रा.उत्पल चौधरी यांनी केले तर आभार उपप्राचार्या सौ.वंदना बोरोले मॅडम यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.