Header Ads

Header ADS

शिष्यांकडून पन्नाशीच्या संन्यासिणीवर आश्रमात सामूहिक बलात्कार, युपीतली धक्कादायक घटना

 

शिष्यांकडून पन्नाशीच्या संन्यासिणीवर आश्रमात सामूहिक बलात्कार, युपीतली धक्कादायक घटना

 लेवाजगत न्यूज:-उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये ५० वर्षीय संन्यासिणीवर आश्रमात सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोमती नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका आश्रमात शिष्यांनीच संन्यासिणीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पीडित महिलेनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आश्रम प्रमुखाने हा प्रकार थांबवण्यासाठी मदत केली नाही. या उलट घटनेची माहिती पोलिसांना दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडितेनं केला आहे. ४ ऑक्टोबरला रात्री हा गुन्हा घडल्याची माहिती पीडितेनं पोलिसांनी दिली आहे. घटनेच्या एक महिन्याआधीच पीडित महिला आश्रमात राहायला आली होती.

प्रयागराजमध्ये पार पडलेल्या माघ यात्रेदरम्यान एका संन्यासिणीच्या संपर्कात आल्यानंतर पीडित महिला आश्रमात दाखल झाली होती. “मी आधी मथुरेच्या आश्रमात राहायचे. 

 माघ यात्रेदरम्यान भेटलेल्या एका संन्यासिणीनं मला तिच्या गुरुच्या लखनऊस्थित आश्रमात जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर श्रावण महिन्यापासून मी या आश्रमात राहायला लागले. काही काळानंतर वाराणसीत राहणाऱ्या भावाची प्रकृती खराब झाल्यानंतर ही संन्यासिण या आश्रमातून निघून गेल्यानंतर मी एकटे पडले”, असे एफआयआरमध्ये पीडित संन्यासिणीने म्हटले आहे. घटनेच्या दिवशी जेवणातून संशयास्पद पदार्थ दिल्यानंतर बेशुद्ध पडल्याचेही पीडितेनं या एफआयआरमध्ये म्हटले आहे.

“जेव्हा मी उठले त्यावेळी मी नग्न होते आणि माझे शरीर थरथरत होते. आश्रमातीलच चार जणांनी माझ्यावर सामूहिक बलात्कार केला होता. याबाबत आश्रम प्रमुखाकडे तक्रार केल्यानंतर जिवंत राहायचं असल्यास तोंड बंद ठेव, असे आश्रम प्रमुखाने म्हटले”, अशी आपबिती पीडितेनं पोलिसांना सांगितली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती लखनऊ पूर्व विभागाच्या पोलिस उपायुक्त प्राची सिंग यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.