न्हावी येथे आजारी वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या
न्हावी येथे आजारी वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या
लेवाजगत न्यूज न्हावी (ता. यावल) -येथील ६४ वर्षीय वृद्धाने आजाराला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली.
न्हावी येथील रहिवासी जयंत काशीराम फिरके (वय ६४ ) गेल्या काही दिवसांपासून दुर्धर आजाराने त्रस्त होते. सोमवारी ते घरी एकटे होते. यावेळी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर प्रकार हा दुपारी दोन वाजेच्या सुमारास निदर्शनास आला. फैजपूर पोलिसांना कळवून मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. येथे डॉ. सचिन देशमुख यांनी शवविच्छेदन केले. नंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी फैजपूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुली, जावई असा परिवार आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत