Header Ads

Header ADS

भुसावळ इगतपुरी मेमू आज रद्द ८, रेल्वे विलंबाने धावणार

 

Bhusawal-Igatpuri-Memu Today-Cancelled-8-Trains-Will-Run-Delayed

भुसावळ इगतपुरी मेमू आज रद्द ८, रेल्वे विलंबाने धावणार 

लेवाजगत न्यूज भुसावळ-चाळीसगाव रेल्वे स्थानकावर उड्डाणपूल गर्डरच्या कामामुळे मंगळवारी (दि.१८) १११२० भुसावळ-इगतपुरी मेमू रद्द झाली आहे. परतीच्या प्रवासात बुधवारी (दि.१९) इगतपुरी-भुसावळ मेमू धावणार नाही. अन्य ८ एक्स्प्रेस उशिराने धावतील.



      ११०७८ जम्मुतवी-पुणे एक्स्प्रेस वाघळी स्टेशनवर सकाळी ८.१५ ते ११.२५पर्यंत थांबेल. १२१४२ पाटलीपूत्र-एलटीटी कजगावला सकाळी ८.३० ते ११.२५पर्यंत, १५०६५ गोरखपूर-पनवेल एक्स्प्रेस गाळण स्टेशनवर सकाळी ८.४० ते ११.२५, तर ११०५६ गोरखपूर-एलटीटी पाचोरा येथे ८.४५ ते ११.२५ पर्यंत, १२७८० निजामुद्दीन-वास्को माहिजीला स्टेशनवर ९.५० ते ११.२५ पर्यंत, १५०१८ गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस शिरसोली १०.२५ ते ११.२५, तर १५६४६ गुवाहाटी-एलटीटी एक्स्प्रेस जळगावला १०.४० ते ११.२५ वाजेदरम्यान थांबेल.

      डाउन लाइनवरील गाड्याही लेट...२०१०३ एलटीटी-गोरखपूर हिरापूर स्टेशनवर सकाळी १०.३५ ते ११.२५ दरम्यान थांबवण्यात येईल. २२१२९ एलटीटी-प्रयागराज एक्स्प्रेस न्यायडोंगरी स्टेशनवर सकाळी पावणेअकरा ते ११.२५ दरम्यान १२८३९ सीएसएमटी-हावडा पिंपरखेड स्टेशनवर १०.५० ते ११.२५ दरम्यान, १२७७९ वास्को निजामुद्दीन नांदगाव स्टेशनवर ११ ते ११.२५ वाजेपर्यंत थांबवण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.