मुख्यमंत्री शिंदे यांच्या बीकेसीतील दसरा मेळाव्याचा खर्चाचा स्रोत काय ? ; चौकशीच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका
(संग्रहित फोटो)
मुख्यमंत्री शिंदे यांच्या बीकेसीतील दसरा मेळाव्याचा खर्चाचा स्रोत काय ? ; चौकशीच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका
वृत्त संस्था मुंबई-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नोंदणी नसलेल्या गटाने वांद्रे-कुर्ला संकुल येथील एमएमआरडीए मैदानावर आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. हे पैसे आले कुठून आणले ? त्यांना ते कोणी उपलब्ध केले ? असा प्रश्न फौजदारी याचिकेद्वारे उपस्थित करण्यात आला आहे. तसेच शिंदे यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी आणि प्राप्तिकर कायद्याच्या तरतुदींअंतर्गत चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते दीपक जगदेव यांनी वकील नितीन सातपुते यांच्यामार्फत ही याचिका केली असून त्यात सीबीआय किंवा मुंबई पोलिसांचा आर्थिक गुन्हे विभाग किंवा अंमलबजावणी संचालनालयासारख्या (ईडी) केंद्रीय यंत्रणांना या निधीच्या चौकशीचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्याच्या विविध भागातून शिंदे समर्थकांना वांद्रे-कुर्ला संकुलापर्यंत आणण्यासाठी एसटीच्या १८०० बसगाड्या आरक्षित करण्यात आल्या होत्या. परिणामी ग्रामीण भागांतील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. याचीही चौकशी करण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत