लाखो रुपये किमतीचे जिवंत वृक्षांची अवैद्य तोड करणारे महाभाग कोण?चौकशी होऊन कारवाई व्हावी अशी मागणी
लाखो रुपये किमतीचे जिवंत महाकाय वृक्षांची अवैद्य तोड करणारे महाभाग कोण?चौकशी होऊन कारवाई व्हावी अशी मागणी
लेवाजगत न्यूज सावदा-सावदा ,कोचुर,रोझोदा, खिरोदा,सावखेडा या रोड दरम्यान सार्वजनिक बांधकाम यांच्या हद्दीत असलेली विविध जातीच्या लाखो रुपये किमतीची झाडांची जिवंत वृक्षाची अवैध तोड करून परस्पर विक्री केली जात आहे. सावदा ते सावखेडा दरम्यान ३३ के.व्ही. उच्च दाब विजवाहिणी, नवीन सब स्टेशन साठी टाकण्याचे काम सुरू असून सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे हद्दीत असलेली झाडे कोणतीही पूर्वपरवानगी न घेता काही लोकांनी तोडून परस्पर विक्री केली आहेत या संदर्भात सार्वजनिक बांधकाम व वन विभाग अनभिज्ञ असून कोणतीही माहिती त्यांच्याकडे उपलब्ध नाही.
दरम्यान ही झाडे लाखो रुपये किमतीची असून एकीकडे शासन झाडे लावण्यासाठी व जगण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करीत असताना शासन हद्दीतील एका विभागाची झाडे परस्पर तोडत असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग सावदा यांच्याकडे माहिती घेतल्यास आमच्या हद्दीतील कोणती झाडे तोडण्यास आम्ही परवानगी दिलेली नाही असे सांगतात परंतु याच विभागातील एका अधिकाऱ्याकडून आम्ही झाडे विकत घेतली असल्याचे तोडणारे व लाकडांचा व्यापार करणारे व्यापारी सांगतात त्यामुळे सार्वजनिक बांधकामाचे आर्थिक लागेबंधे या वृक्षतोड करणाऱ्या लोकांसोबत नाही ना या निमित्ताने शंका उपस्थित होत असून सार्वजनिक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करावी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे असा आरोप कोचुर येथील सामाजिक कार्यकर्ते कमलाकर पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. या तोडलेल्या झाडांची वाहतूक सर्रासपणे होत असून वन विभागाचे भरारी पथक काही ट्रॅक्टर सोडून देत आहेत तर तक्रारीनुसार एक दिवस एक टाटा ४०७ ही मालवाहतूक गाडी वन विभागाने केवळ देखावा म्हणून पकडलेली आहे.
सार्वजनिक बांधकामाचे आर्थिक लागेबांधे
सार्वजनिक बांधकाम कडून यापूर्वीही अनेक झाडे कवडीमोल भावात विकून अशाच प्रकारे शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडवला गेला आहे. कोणत्याही प्रकारचा लिलाव न करता वनविभागाकडून मूल्यांकन न करता मोठ्या प्रमाणात झाडे काही लोकांना विक्री केल्याचे समोर आले आहे.त्यामुळे या लाकूडतोड करणाऱ्या व्यापाऱ्यांची सार्वजनिक बांधकाम उपविभाग सावदा येथील अधिकाऱ्यांचे आर्थिक कनेक्शन तर नाही ना हे देखील कमलाकर पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
तो पैसे घेणारा अधिकारी कोण लाकूडतोड करणाऱ्या मजुरांना तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून ही वृक्ष, लाकडे ,झाडे तोडत आहात या संबंधित माहिती विचारल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अधिकाऱ्यास आम्ही परवानगी घेऊन त्यांना पैसे देखील दिल्याचे हे मजूर सांगत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम उपविभाग सावदा येथील अधिकाऱ्यांची कसून चौकशी होणे गरजेचे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत