दिव्यत्वाच्याप्रचिती द्वारे मोक्षप्राप्ती हेच मानवजातीचे अंतिम ध्येय .... जेष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ .रविंद्र भोळे
दिव्यत्वाच्याप्रचिती द्वारे मोक्षप्राप्ती हेच मानवजातीचे अंतिम ध्येय .... जेष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ. रविंद्र भोळे
लेवाजगत न्यूज शिंदवणे: गीतेमध्ये भगवंताने मानवाच्या कल्याणासाठी अठरायोगाचे अठरा अध्यायात विश्लेषण केले आहे.त्यातील आठव्या अध्यायातील दहाव्या श्लोकात अक्षरब्रह्मयोगात मोक्षप्राप्तीचे वर्णन करून अंतकाळी माझा भक्त दोन्हीभुवयामध्ये आज्ञा चक्रामध्ये प्राणवायूला स्तिर करून नामस्मरण करीत मोक्ष प्राप्ती करून विलीन होतो. काही भक्त यम,नियम, आसन,प्रत्याहार,प्राणायाम, ध्यान, धारणा व समाधी ह्या अष्टांगयोगा द्वारे समाधिस्थ होतात . काही भक्त तंत्रसमाधी, चिरंजीव समाधी, पवित्र समाधी,जलसमाधी, संजीवन समाधी घेऊन प्राण पंचमहाभुतात विलीन करून सदैव्य चिरकाल चैतन्यमय होतात.परमेश्वराची लीला समजण्याकरिता गीता मार्गदर्शक मंत्र असून जिवात्म्याचे अंतिम रहस्याचा उहापोह होतो. दिव्यात्वाच्या प्रचीतिद्वारे मोक्ष प्राप्ती हेच मानवजातीचे अंतिम ध्येय आहे, असे मत ज्येष्ठ समाज सेवक, प्रवचनकार डॉ रविंद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले.शिंदवणे येथे आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात प्रवचनरुपी सेवेचे दुसरे पुष्प गुंफताना वरील मत व्यक्त करून डॉ रविंद्र भोळे यांनी असे मार्गदर्शन केले की पृथ्वीवरील जन्माला आलेला प्रत्येक जीवात्मा कधी ना कधी मृत पावणार आहे भगवंत चारानि विलिन होईपर्यंत जन्म मृत्यू, सुख दुःख, भोगावे लागतात. ह्यासाठी परमात्म स्वरूप होउन विकर्म, अकर्म सोडून निष्काम कर्मयोग. साधून सात्विकता जपावी, असे मत ज्येष्ठ समाज सेवक प्रवचनकार डॉ रविंद्र भोळे यांनी येथे अखंड हरिनाम सप्ताहात जी वरील मत व्यक्त करून प्रबोधन केले . ह्या प्रसंगी गावकरी,परिसरातील भाविक भक्त,उपस्थित होते शिंदवणे तहसील हवेली येथे अठ्ठावीस वर्षेपासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून अनेक प्रवचनकार कीर्तनकार प्रबोधनकार ह्यांचे मार्ग दर्शन होत असते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत