Header Ads

Header ADS

डेंग्यूचे पाच रुग्ण भुसावळ मध्ये आढळल्याने खळबळ

डेंग्यूचे पाच रुग्ण भुसावळ मध्ये आढळल्याने खळबळ


डेंग्यूचे पाच रुग्ण भुसावळ मध्ये आढळल्याने खळबळ

लेवाजगत  न्यूज भुसावळ -शहरात गेल्या आठवड्यापासून पाऊस होत आहे. यामुळे सखल भाग, खुल्या भूखंडांवर पाणी साचून डासोत्पत्ती वाढली. परिणामी डेंग्यूने पुन्हा डोके वर काढले आहे. सध्या शहरात डेंग्यू सदृश पाच रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

     तर शांती नगरातील डेंग्यू बाधित दोघांना डिस्चार्ज देण्यात आला. शहरात गेल्या आठवड्यात डेंग्यूचे ७ रुग्ण आढळले होते. यापैकी दोन रुग्णांना शनिवारी उपचाराअंती डिस्चार्ज देण्यात आला. सध्या पाच रुग्णांवर उपचार सुरु आहेत. प्लेट लेट कमी झाल्याने तसेच लक्षणांनुसार या रुग्णांवर डेंग्यू सदृश म्हणून उपचार सुरू आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.