Header Ads

Header ADS

इंजिनिअरिंग प्रवेशाच्या अडचणी दूर करण्यासाठी कार्यशाळा

 

इंजिनिअरिंग प्रवेशाच्या अडचणी दूर करण्यासाठी कार्यशाळा

इंजिनिअरिंग प्रवेशाच्या अडचणी दूर करण्यासाठी कार्यशाळा 

लेवाजगत  न्यूज जळगाव -सीईटी सेलतर्फे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली असून, तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीवर आक्षेप नोंदवण्यासाठी १० ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अंतिम गुणवत्ता यादी १२ रोजी जाहीर करण्यात येणार आहे.विद्यार्थी आणि पालकांना प्रवेश घेताना अनेक अडचणी येतात. 

     नेमके कुठे प्रवेश घ्यावे, कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा, अर्ज कसा भरावा याबाबत पालकांच्या शंका दूर करण्यासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ११ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता शहरातील विद्यार्थ्यांसाठी तर १२ रोजी जिल्ह्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

      या वेळी प्राचार्य उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या विविध शंकांचेदेखील निरसन करणार आहे. त्यामुळे या कार्यशाळेत जळगाव जिल्ह्यातील अधिकाधिक विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.