जळगावात बीएसएनएल ची ४जी मार्च तर ५जी ऑगस्ट मध्ये होणार सुरु
जळगावात बीएसएनएल ची ४जी मार्च तर ५जी ऑगस्ट मध्ये होणार सुरु
लेवाजगत न्यूज जळगाव-बीएसएनएल सोडून इतर खासगी कंपन्यांची ४ जी, तर काही शहरात ५ जी सेवा सुरू आहे. मात्र, यात बीएसएनएल अजूनही ३ जी सेवेवरच अडकली आहे. याचा परिणाम बीएसएनएलच्या ग्राहकांवर होताे आहे. नवीन वर्षांत मार्चपर्यंत ४ जी तर ऑगस्टपर्यंत ५ जी सेवा जळगावात सुरू हाेईल.खासगी कंपन्यांची ही सेवा विदेशी तंत्रज्ञानावर आधारित असली तरी बीएसएनएलची ४ जी व ५ जी सेवा संपूर्ण मेक इन इंडिया अंतर्गत स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित राहणार असल्याचे बीएसएनएलतर्फे सांगण्यात आले.
खासगी कंपन्यांची ४जी सेवा आधीपासूनच देशाच्या कानाकोपऱ्यात सुरू आहे. तर ५जी इंटरनेट सेवा ही देशातील काही शहरात सुरू झाली आहे. बीएसएनएलची ४जी सेवा अजूनही सुरू झाली नाही. मात्र, मार्चपर्यंत ४जी तर ऑगस्टपर्यंत ५जी ही संपूर्ण देशी टेक्नॉलॉजीने युक्त अशी इंटरनेट सेवा जळगावात सुरू होणार आहे. या टेक्नॉलॉजीमुळे इंटरनेटचा डाटा स्पीड वाढू शकणार आहे.
लवकरच जळगावातही ५ जी सेवा
जळगावात बीएसएनएल सोडून सर्वच खासगी कंन्यांनी ४जी सेवा सुरू केली आहे. तर ५जीसाठी जीओसह एअरटेल आघाडीवर आहे. यात एअरटेल कंपनीने महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर येथे ५जी सेवा सुरू केली आहे. तर नवीन वर्षात जळगावातही एअरटेलची ५जी सेवा सुरू होऊ शकते असे सांगण्यात येत आहे.
संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञान
४ जी व ५ जीसाठी भारतीय कंपनीला काम देण्यात आले असून, चाचणी घेणे सुरू आहे. दोन्ही टेक्नॉलॉजी एकाच वेळी विकसित होत असल्याने मार्चपर्यंत ४ जी तर ऑगस्टपर्यंत ५जी सुरू होईल.- संजयकुमार केसवाणी, महाप्रबंधक, बीएसएनएल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत