सावदा कोचुर मार्गावर दुचाकींची समोरा-समोर धडक : एक तरूण ठार, दोन जखमी
(फोटो-कुणाल मधुकर साळी)
सावदा कोचुर मार्गावर दुचाकींची समोरा-समोर धडक : एक तरूण ठार, दोन जखमी
लेवाजगत न्यूज सावदा -सावदा-कोचूर मार्गावरील वळणावर दोन दुचाकींची समोरा-समोर धडक झाल्याने एक जण ठार झाला असून दोन जखमी झाले आहेत.
या संदर्भातील माहिती अशी की, आमोदा भिकनगाव महामार्गावर सावदा ते कोचूर रस्त्यावरील पहिल्या वळणावर आज दोन दुचाकींची समोरा-समोर जोरदार धडक झाली. या अपघातात सावदा येथिल रहिवाशी एक जण ठार झाला असून चिनावल येथील दोन जखमी झाले आहेत. गुरुवार दुपारी बारा वाजेच्या सुमारास हा अपघात घडल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना फैजपूर येथील शैलेश खाचणे यांच्या आशीर्वाद हॉस्पटिल मध्ये दाखल केले.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एमएच१५ डीव्ही १३०६ आणि एमएच१९ डीजी ८४६७ क्रमांकांच्या बाईक यांची समोरासमोर धडक झाली. यात कुणाल मधुकर साळी यांचा मृत्यू झाला असून यश किशोर धांडे आणि पुष्कर हेमा बढे हे दोन जण जखमी झाले आहेत. जखमी झालेले दोन्ही जण हे चिनावल येथील रहिवासी असून त्यांना फैजपूर येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. तर, याबाबत सावदा पोलीस स्थानकात नोंद करण्याचे काम सुरू होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत