Header Ads

Header ADS

जळगावात पतीने पत्नीचा गळा आवळून केला खून

 

Jaḷagāvāta-patīnē-patnīcā-gaḷā-āvaḷūna-kēlā-khūna



जळगावात पतीने पत्नीचा गळा आवळून केला खून

लेवाजगत न्यूज जळगाव -शहरात पुन्हा एकदा खून झाला असून पतीने पत्नीचा गळा आवळून तिची हत्या केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


जळगाव शहरातील आहुजा नगर परिसरातील शिवधाम मंदिरासमोरील ब्रम्हांडनायक अपार्टमेंटमध्ये पतीने पत्नीचा मोबाईल चॉर्जरच्या वायरने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना आज शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली आहे. कविता जितेंद्र पाटील वय २० असे मयत विवाहितेचे नाव आहे. तर जितेंद्र संजय पाटील वय २५ असे संशयित पतीचे नाव आहे. जितेंद्र हा पत्नीला गळफास दिल्यानंतर स्वतःच तालुका पोलीस ठाण्यात हजर झाल्याची ही माहिती मिळाली आहे. पत्नीचे तरुणासोबत असलेल्या अनैतिक संबंधातून पतीने हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.



या संदर्भात मयत महिलेच्या आप्तांकडून मिळालेली माहिती अशी की, आहुजा नगर परिसरात ब्रह्मांडनायक अपार्टमेंट असून अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये जितेंद्र संजय पाटील हा पत्नी कविता व दीड वर्षाची मुलगी या कुटुंबासह वास्तव्यास आहे. जितेंद्र हा मिळेल ते काम करुन तो उदरनिर्वाह भागवितो. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता पती जितेंद्र याचा पत्नीसोबत वाद झाला. या वादातून जितेंद्र याने मोबाईलच्या चार्जरच्या वायरने पत्नी कविता हिचा गळा आवळून खून केला. पत्नीचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावर पती जितेंद्र हा स्वतःच तालुका पोलीस ठाण्यात हजर झाला. व त्यानेच पोलिसांना मी पत्नीचा खून केल्याची माहिती दिली. त्यानुसार तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठले. तातडीने कविता हिचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवला. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची पुढील कारवाई सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.