Header Ads

Header ADS

अपहरणाचा बनाव करणारे तरुण तरुणी विवाह करून पोलीस ठाण्यात हजर

 

Kidnapping-fake-marriage-presence-at-the-police-station

अपहरणाचा बनाव करणारे तरुण तरुणी विवाह करून पोलीस ठाण्यात हजर

लेवाजगत न्यूज फैजपूर- शहरातून सोमवारी सकाळी  तरूणीचे अपहरण झाल्याची  घटना घडल्याने खळबळ उडाली असतांना तीच तरूणी आज आपल्या प्रियकरासह विवाह करून पोलीस ठाण्यात हजर झाल्याची घटना घडली आहे.

        ही तरूणी आपल्या आजीसह सकाळी  प्रांताधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जात असतांना हा प्रकार घडला. यात पंजाबी ड्रेस घालून आलेल्या तरूणाने महिलेच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून तिच्या नातीला घेऊन पळ काढला होता. या संदर्भात संबंधीत तरूणीच्या आजीच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस स्थानकात अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  दरम्यान, या प्रकरणासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असतांनाच  अपहरण झालेली तरुणी ही मंगळवारी  आपल्या प्रियकरासह विवाह करून पोलीस ठाण्यात मध्ये हजर झाली. यामुळे या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. अर्थात, काल अपहरणाचा बनाव करून ही तरूणीच आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याचेही यातून अधोरेखीत झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.