किनगावच्या युवकाची ठाण्यामध्ये आत्महत्या
किनगावच्या युवकाची ठाण्यामध्ये आत्महत्या
लेवाजगत न्यूज यावल - तालुक्यातील किनगाव येथील रहिवासी २२ वर्षीय तरूणाने ठाणे येथे गळफास घेत आत्महत्या केली. हा तरूण येथे गोदरेज कंपनीत नोकरीला होता. तो ठाणे येथील वर्तक नगरात मामाच्या घरी राहत होता. गणेश अनिल निंबायत असे मृताचे नाव आहे.आत्महत्येपुर्वी त्याने सुसाइड नोट लिहून निराशा व्यक्त केली होती.
किनगाव येथील रहिवासी गणेश निंबायत याने बुधवारी पहाटे मामाच्या घरात गळफास घेतला. तत्पूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत मी एक जबाबदार मुलगा, भाऊ होऊ शकलो नाही, असा उल्लेख करत निराशा व्यक्त केली होती. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.
देवा जीवनाची लढाई तू जिंकलास, अभिनंदन
मला जीवनाचे अजिबात ओझे नाही कोणता तणाव नाही. मी जीवनात ताणतणाव पचवण्याचा खूप प्रयत्न ठाणे केला. मी अनेकदा स्थिर होण्याचा प्रयत्न केला. अनेकदा संयम राखण्याचा प्रयत्न केला. पण दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच बिकट होत गेली. अधिक चांगला आहे. मुलगा होण्याचा, भाऊ होण्याचा खूप प्रयत्न केला. मी माझ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पूर्ण करू शकलो नाही याचे वाईट वाटत आहे. नेहमी येणाऱ्या अपयशाने मी मनाने व शरीराने पूर्णपणे खचलो आहे. म्हणून मी माझ्या जीवनाचा अंत करण्याचे ठरवले. माझ्यासाठी कोणीही रडू नका, शेवटी चिरशांती, पूर्णविराम देवा शेवटी जीवनाची लढाई तू जिंकलास तुझे अभिनंदन. - तुमचाच अपयशी मुलगा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत