सावद्यात आज होणार दुर्गा विसर्जन-रात्री दहा वाजेपर्यंत वाद्य व मिरवणुकीला परवानगी
सावद्यात आज होणार दुर्गा विसर्जन-
रात्री दहा वाजेपर्यंत वाद्य व मिरवणुकीला परवानगी
लेवाजगत न्यूज सावदा- सावदा येथे घटस्थापने पासून १६ दुर्गा उत्सव मंडळांनी सहभागी होऊन श्री.दुर्गा मातेच्या मूर्तीची स्थापना व घटस्थापना केली होती. दररोज गरबा दांडिया चे नृत्य आनंदाने करीत भक्तीमय वातावरणात नऊ दिवस हा उत्साह तरुण-तरुणींनी कायम ठेवला. महिला भाविकांनी नऊ दिवस श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचन करून उत्साह पूर्ण वातावरणात भक्ती भावे पूजा पार पाडली. आज गुरुवार रोजी उत्साह वातावरणात श्री दुर्गा विसर्जन करण्यात येणार आहे.
आज १६ मंडळे विसर्जन मिरवणुक शहराच्या प्रमुख मार्गावरून ढोल ताशे,डफ, बँड, आणि बँजोच्या तालात मिरवणूक निघणार आहे. रात्री दहापर्यंत मिरवणुकीला परवानगी असून दहा नंतर मिरवणूक वाद्य यास परवानगी नाही. सहायक पोलीस निरीक्षक देविदास इंगोले त्यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड व पोलीस कर्मचारी व गृहलक्षक दलाचे जवान बंदोबस्तकांनी गावात शांतता राखत आहे.
या मंडळांनी घेतले आहे सहभाग
शहरातील , आदर्श, बाल दुर्गा, दुर्गा उत्सव समिती, भारत, अजिंक्य, मरी माता, एकता, संघर्ष, जय मातादी ,छत्रपती संभाजी ,सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ, मातारानी, शिवदुर्गोत्सव मंडळ ,न्यू एकता, मा भवानी ,नवयुवक असे १६ मंडळ आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत