लग्नाचे आमिष दाखवून सहाय्यक पोलीस निरीक्षकाकडून सहकारी महिलेवर अत्याचार; बलात्काराचा गुन्हा दाखल
लग्नाचे आमिष दाखवून सहाय्यक पोलीस निरीक्षकाकडून सहकारी महिलेवर अत्याचार; बलात्काराचा गुन्हा दाखल
लेवाजगत न्यूज नवी मुंबई:- लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षांपासून शारीरिक शोषण करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षका विरोधात नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील फिर्यादी पीडित महिला ही सुद्धा पोलीस दलातच कार्यरत आहे. अनिकेत शिंदे असे आरोपीचे नाव आहे. पीडित महिला आणि अनिकेत यांच्यात दोन वर्षापासून प्रेमसंबंध होते. पीडिता सुरवातीपासून लग्न करण्याविषयी आग्रही होती मात्र विविध कारणे सांगून शिंदे हा लग्नाचा विषय टाळत होता.
मात्र काही दिवसांपासून अनिकेत हा पीडितेला टाळत होता. त्याने संपर्क ही बंद केला त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे पिडीतेला लक्षात आले व तिने रबाळे पोलीस ठाण्यात अनिकेत विरोधात लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे अद्याप आरोपीला अटक केले नसून गुन्ह्याचा तपास सुरु आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत