जळगावात डंपरने घेतला पुन्हा एक बळी : तरूणी ठार; भाऊ बचावला !
जळगावात डंपरने घेतला पुन्हा एक बळी : तरूणी ठार; भाऊ बचावला !
लेवाजगत न्यूज जळगाव-भरधाव डंपरने आज पुन्हा एक बळी घेतला असून दुचाकीला दिलेल्या धडकेत तरूणी ठार झाली असून तिचा भाऊ थोडक्यात बचावला आहे.
शिव कॉलनी रेल्वे उड्डाण पुलाजवळ भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक देताच दुचाकीवर बसलेल्या तरुणीचा जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली आहे. जळगावकडून धुळ्याकडे जाणारा डंपर क्रमांक ( एमएच १९ सीवाय ३३११) हा शिव कॉलनी कडून रेल्वे उड्डाणपुराकडे जात होता. त्यावेळेस पुढे जाणारी मोपेड दुचाकी (एमएच १९ सी ७१६९) याला डंपरने मागून जोरदार धडक दिली. यात दुचाकीवर बसलेल्या मनस्वी उर्फ ताऊ सुभाष सोनवणे (वय-२० रा.खोटे नगर, जळगाव) या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात तरुणीचा भाऊ नचिकेत सुभाष सोनवणे (वय २५ रा. खोटे नगर, जळगाव) हा थोडक्यात बचावला आहे.
मनस्विनी ही शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा राज्यभर गाजलेल्या गर्जना संघटनेचे प्रमुख सुभाष सोनवणे यांची मुलगी तर भाजप नगरसेवक मुकुंदा सोनवणे यांची बहिण होती. मनस्विनी ही सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होती. आपल्या मुलीची जिद्द आणि अभ्यासातील प्रगती लक्षात घेता, सीए परीक्षेच्या तयारीला परिवारातूनच प्रोत्साहन मिळाले. आज कॉलेजमध्ये जाण्यासाठी निघाली असता, वडिलांनी आग्रह केला होता. मात्र भावाच्या गाडीवर जाते असे सांगून ती कॉलेजमध्ये गेली होती
ही दुर्घटना मंगळवारी १५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालया करावा लागेल दरम्यान रामानंदनगर पोलिसांनी राखेने भरलेला डंपर ताब्यात घेतला असून याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत