उस्मानाबाद येथील ट्रक चालकाचा सावद्यात ह्रुदय विकाराने मृत्यू...!
उस्मानाबाद येथील ट्रक चालकाचा सावद्यात ह्रुदय विकाराने मृत्यू...!
प्रतिनिधी सावदा -येथे उस्मानाबाद येथील रहिवासी महेश विलास सोनटक्के वय २८ यास दिनांक १५ रोजी ताब्यातील ट्रक खिरोदा मार्गावर साईडला लावून तो व त्याचा चुलत भाऊ झोपला असता रात्री १; ३० वाजेच्या सुमारास त्याला हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्या घटनेत त्याचा मृत्यू झाल्याचे डाँक्टर सुनील चौधरी यांनी सांगितले .
प्राप्त माहिती नुसार असे की ; उस्मानाबाद येथील महाकाय १२ टायरी ट्रक कृषी उत्पन्न बाजारात समितीत ज्वारी भरण्यासाठी आला होता. खिरोदा मार्गावर असलेल्या पेट्रोल पंपाच्या बाजूला रस्त्याच्या कडेला उभी करून महेश सोनटक्के व त्याचा चुलत भाऊ विकास पोपट सोनटक्के बिंबडी तालुका उस्मानाबाद हे दोघे दिनांक १४ रोजी रात्री ८ वाजता ट्रक मध्ये झोपले असता दिनांक १५च्या पहाटे महेश सोनटक्के याच्या छातीमध्ये जळजळ होऊन एक वांती होताच त्याला प्रथम उपचारासाठी एक वाजून तीस मिनिटांनी जवळच असलेल्या गजानन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सुनील चौधरी यांच्याकडे प्रथम उपचार साठी दाखल करण्यात आले.उपचार दरम्यान चार वाजून दहा मिनिटांनी डॉक्टरांनी त्याची तपासणी करून महेश सोनटक्के मयत झाल्याचे घोषित केल्याने त्या बाबत त्याचा चुलत भाऊ विकास पोपट सोनटक्के यांनी पोलिस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सपोनि जालिंदर पळे यांचे मार्ग दर्शना खाली सहकरी करीत आहे .या घटनेची माहिती दंडाधिकारी यांना देण्यात आली आहे ,.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत