Contact Banner

कोणतेही कारण नसतांना मजूरावर विळ्याने वार ,एका महिलेवर सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Kāhīhī-ēka kāraṇa-nasatānnā- majūrāvara-viḷyānē-vāra,ēkā- mahilēvara-sāvadā-pōlīsa- ṭhāṇyāta-gunhā-dākhala


काहीही एक कारण नसतांना मजूरावर विळ्याने वार ,एका महिलेवर सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लेवाजगत न्यूज सावदा- येथील बुधवार पेठ भागातील साळी वाड्यात काही एक कारण नसताना एकाला विळ्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे. याबाबत संशयित महिलेवर सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      सावदा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ज्ञानेश्वर दत्तात्रय साळी (वय-४५) रा. बुधवार पेठ, सावदा तालुका रावेर जिल्हा जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. १२ नोव्हेंबरशनिवार  रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास  ज्ञानेश्वर साळी हा त्याच्या घरी उभा होता. त्यावेळी काही एक कारण नसताना आशाबाई खुशाल साळी या महिलेने वेड्याचा असा उल्लेख करून शिवीगाळ करून तिच्या हातातील विळ्याने ज्ञानेश्वर साळी यांच्या तोंडावर वार केले. यामध्ये त्याच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली आहे. या संदर्भात तातडीने त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.  ज्ञानेश्वर साळी याच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी महिला आशाबाई खुशाल साळी हिच्या विरोधात सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास सहाय्यक फौजदार मेहमूद शहा करत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.