Header Ads

Header ADS

पूर्ववैमनस्यातून चाळीसगाव येथे तरुणाचा खून,माजी नगरसेवक पुत्रासह १२ जणांवर गुन्हा दाखल

 

पूर्ववैमनस्यातून चाळीसगाव येथे तरुणाचा खून,माजी नगरसेवक पुत्रासह १२ जणांवर गुन्हा दाखल

पूर्ववैमनस्यातून चाळीसगाव येथे तरुणाचा खून,माजी नगरसेवक पुत्रासह १२ जणांवर गुन्हा दाखल 

वृत्तसंस्था चाळीसगाव -शहरातील पवार वाडी भागातील २८‎ वर्षीय तरूणाचा, चॉपरने वार करून‎ ‎ खून केल्याची‎ ‎ घटना, रविवारी‎ ‎ सायंकाळी‎ ‎ शहरात घडली.‎ ‎ भावडू उर्फ‎ ‎ दिनेश वाल्मीक‎ ‎ जाधव असे मृत‎ ‎ तरुणाचे नाव‎ आहे. पूर्ववैमनस्यातून ही घटना‎ घडल्याची समोर आले.‎ याप्रकरणी माजी नगरसेवकाच्या‎ तिन्ही मुलांसह १२ जणांवर‎ चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला‎ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.‎

     पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात‎ घेतले आहे. रविवारी मकर‎ संक्रांतीच्या दिवशी सायंकाळी ६.४०‎ वाजता, भावडू उर्फ दिनेश वाल्मीक‎ जाधव (रा. पवारवाडी) हा त्याचा‎ मित्र निखील अशोक राजपूत‎ याच्यासोबत, पोद्दार शाळेच्या‎ अलीकडे असलेल्या‎ स्मशानभूमीजवळ गप्पा मारत उभे‎ होते. तिथे संशयित अंकित महेंद्र‎ मोरे, संकेत महेंद्र मोरे, अनिकेत‎ महेंद्र मोरे, मुकेश उर्फ भुऱ्या मोरे‎ (रा.हनुमानवाडी), रोहीत उर्फ‎ पावट्या अशोक गवळी (रा.‎ शिवाजी चौक), हर्षल दीपक‎ राठोड (रा.जुना मालेगाव रोड),‎ शाम उर्फ भोला (पूर्ण नाव नाही) व‎ इतर पाच अनोळखी संशयित बुलेट,‎ पल्सरवर बसून आले. त्यांनी भावडू‎ उर्फ दिनेश जाधव याचा खून केला.‎

     नागरिक धावून आल्याने संशयित पुलाकडे पसार‎ निखिल राजपूतने आरडाओरड केल्याने नागरिक धावून आले. त्यामुळे सर्व‎ जण दुचाकींवर तिरंगा पुलाच्या दिशेने पळून गेले. नागरिकांनी जखमीला‎ खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. याप्रकरणी‎ मृताचे वडील वाल्मीक जाधव यांच्या फिर्यादीवरुन, खुनाचा गुन्हा दाखल‎ झाला. सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर ढिकले तपास करत आहेत.‎

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.