जाळीचा देव पदयात्रेचे बारागावपिंप्रीत स्वागत
जाळीचा देव पदयात्रेचे बारागावपिंप्रीत स्वागत
लेवाजगत न्यूज सिन्नर -बारागावपिंप्री येथे श्री चक्रधर स्वामी चरणांकित स्थान दर्शन, प्रसाद वंदन व समाज प्रबोधन पदयात्रेचे बारागावपिंप्रीत स्वागत करण्यात आले. श्रीकृष्ण मंदिर शिंदे (नाशिक) ते श्री क्षेत्र जाळीचा देव अशी ही यात्रा आहे.
सरपंच संध्या विजय कटके यांनी पालखीचे पूजन करून विडा अवसर देवाला अर्पण केला. यावेळी भाविकांना खजूर पाकीट, पेढे, मँगो ज्यूस, तिळगुळ आदी पदार्थांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय गोसावी, प्रभाकर गोराडे, प्रकाश सांगळे, वाल्मीक उगले, नामदेव गोसावी, विष्णू गोसावी, पांडुरंग संत, दत्ता जोशी, सीताबाई गोसावी, मीराबाई गोसावी, सुलोचना गोसावी, माधुरी गोसावी आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत