Header Ads

Header ADS

बाईक भिंतीवर धडकल्याने मामे भाऊ व आते भाऊ चा दुर्देवी‎ मृत्यू

बाईक भिंतीवर धडकल्याने मामे भाऊ व आते भाऊ चा  दुर्देवी‎ मृत्यू


बाईक भिंतीवर धडकल्याने मामे भाऊ व आते भाऊ चा  दुर्देवी‎ मृत्यू 

लेवाजगत न्यूज वरणगाव -भरधाव दुचाकी बोहर्डी‎ (ता.भुसावळ) लगतच्या‎ उड्डाणपुलाच्या भिंतीला धडकल्याने‎ मामेभाऊ व आतेभावाचा दुर्देवी‎ मृत्यू झाला. सूरज रामदास तांबे‎ (वय १५, रा.काहुरखेडे) आणि‎ सुनील विठ्ठल भालेराव (वय २०,‎ रा.वाघारी, ता.जामनेर) अशी‎ मृतांची नावे आहेत. यापैकी सूरज‎ याच्या मोठ्या भावाचे सोमवारी‎ वर्षश्राद्ध होते. याच दिवशी‎ कुटुंबीयांना दुसरा मुलगा गमवावा‎ लागला.‎ 

     रामदास तांबे यांचा मोठा मुलगा‎ गोविंदा याचा गेल्या वर्षी अकस्मात‎ मृत्यू झाला होता. त्याच्या‎ वर्षश्राद्धासाठी सोमवारी तांबे यांच्या‎ घरी काहुरखेडे येथे छोटेखानी‎ कार्यक्रम होता. हा कार्यक्रम‎ आटोपल्यानंतर रामदास तांबे यांचा‎ मुलगा सूरज तांबे (वय १५,‎ रा.काहुरखेडे) आणि भाचा सुनील‎ विठ्ठल भालेराव (वय २०,‎ रा.वाघारी ता.जामनेर) हे दोघे‎ मामेभाऊ व आतेभाऊ काहुरखेडे‎ येथून बोहर्डीकडे दुचाकीने जात‎ होते.

     दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास‎ बोहर्डीजवळ त्यांची अनियंत्रित‎ झालेली दुचाकी उड्डाणपुलाच्या‎ भिंतीला धडकली. त्यात सूरज‎ तांबे याचा जागीच मृत्यू झाला. तर‎सुनील भालेराव हा गंभीर जखमी‎ झाला. त्याला जळगाव येथील‎ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.‎ पण, उपचारादरम्यान मृत्यू झाला.‎ मृत सूरज याचे शवविच्छेदन‎ वरणगाव ग्रामीण रुग्णालयात डॉ.‎ क्षीतिजा हेंडवे यांनी केले. रात्री‎ उशिराने अंत्यसंस्कार झाले.‎

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.