Contact Banner

त्वचा रोगातील आयुर्वेद अनुसार पथ्य-डॉ सुशांत शशिकांत पाटील

 

त्वचा रोगातील आयुर्वेद अनुसार पथ्य-डॉ सुशांत शशिकांत पाटील

त्वचा रोगातील आयुर्वेद अनुसार पथ्य-डॉ सुशांत शशिकांत पाटील

       मागील एका लेखामध्ये आपण पाहिले होते की सोरायसिस बरा होतो का. असलेल्या अनेक लेखांपैकी तो एक लेख होता. त्वचारोग आणि आयुर्वेदोक्त पथ्य या लेखन मालेमध्ये आज आपण पहिला भाग पाहणार आहोत.

    अनुचित आहार विहार तसेच अनुचित जीवनशैली या कारणामुळे भारत वर्षात त्वचारोगांचे प्रमाण दहा ते बारा टक्के अधिक वाढलेले आहे. केवळ आहार विहाराचे यथोचित ध्यान राखल्यास त्वचारोग अनेक स्तरावर कमी होऊ शकतात.

   वस्तुतः प्रत्यक्ष पाहिल्यास आयुर्वेदाने आहाराचे सविस्तर मार्गदर्शन केलेले आहे. ब्रिटिश आल्यानंतर तसेच वाढत्या पाश्चिमात्य आहार शैली आणि जीवनशैली आत्मसात केल्यामुळे आपण सर्वच आयुर्वेदाच्या उपदेशांना विसरून गेलेलो आहोत. आता जर स्वास्थ्य टिकवून ठेवायचे आहे तर आयुर्वेदाने प्रतिपादित केलेले आहार विहार नियम पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा त्वचारोगांशी खेरीज अन्य आजार समस्या उत्पन्न होतील. उत्पन्न होताना ही दिसत आहेत.   

     त्वचारोगातील पथ्य आहार

पथ्य अर्थात शरीराला उपकारक आणि पथ्याहार म्हणजे शरीराला उपकारक आहार. आयुर्वेदात प्रत्येक व्याधीसाठी वर्णन करीत असताना पथ्या आहाराचे अत्यंत स्तुत्य वर्णन केलेल आहे.

 १) आयुर्वेद च्या अनुसार सर्व त्वचारोगात लवकर पचणारे म्हणजेच लघु अन्नपदार्थांचे सेवन करायला हवे. जसे यव धान्य, ज्वारीची पोळी, अथवा ज्वारीची पेज. यांचे सेवन केल्याने यांचे पचन लवकर होते. परिणाम स्वरूप शरीरात उत्तम धातू निर्माण होतात जे शरीराला स्वस्थ ठेवतात.

२) भाज्यांच्या विषयावर बोलत असताना, माझ्या कडू आहेत त्यांचे सेवन करायला हवे. कारले चक्रमर्द, जिवंती, मेथी, शेरण्या.

भाजी बनवत असताना कडुलिंबाची फुले अथवा कोमल पाने भाजीमध्ये टाकायला हवीत. भाजीमध्ये भिलावा अथवा त्रिफळा टाकण्याचे देखील संदर्भ आहेत. बिलाव्याच्या फळात एक पिवळा आणि एक काळा भाग असतो. भाजी करत असताना यातील पिवळ्या भागाचे पण काप भाजी टाकावे. त्रिफळा ने सिद्ध केलेले जल ही साठी वापरावे. हे वाचून सर्वांनाच वाटले असेल त्रिफळा सिद्धजलाचे भाजी अथवा पदार्थ स्वादाला चांगले तर अजिबात नसावेत. परंतु जर ठीक व्हायचे आहे तर अशा पदार्थांचे सेवन करायला लागेल. पथ्य पाळले  नाही तर साधारण दाद पण वर्ष भर त्रास देत असल्याचे आपल्या लक्षात येते. 

   एक गोष्ट लक्षात घ्या बिलावा आणि त्रिफळा वस्तूतः औषधी आहे. हे आहार द्रव्य नाहीत. तरीसुद्धा आचार्यांनी यांचे सेवन करायला सांगितले आहे. याचा अर्थ असाच आहे की, व्याधी बळ जास्त असताना केवळ औषधी रूप पदार्थ सेवन करणे पर्याप्त नसते. याच करता आचार्यांनी आहारातील पदार्थ आणि औषधी पदार्थ यांना एकत्रित स्वरूपात पथ्य आहार वर्णन करीत सांगितले आहे. चिकित्सा करत असताना फार कमी वेळा असे होते, याच करता आचार्यांनी बिलावा त्रिफळा तसेच लिंबाची फुले आणि पाने यांनी सिद्ध घृताचेही सेवन सांगितले आहे. 

३) आचार्यांनी त्वचारोगातील पथ्या आहाराचे वर्णन करत असताना, पुराण धान्य सेवन सांगितले आहे. पूर्वीच्या काळी धान्य उन्हात सुकवून जमिनीच्या आत छोटा हौद अथवा विवर खोदून एक वर्षभर त्यात धान्य ठेवण्याची परंपरा होती. ही परंपरा सध्या लुप्त झालेली आहे. परंतु या विधीमध्ये धान्य लघु गुणाचे होऊन पचायला हलके होत होते. लवकर पचल्यास पाचन तंत्र देखील सुधारून स्वस्थ राहत होते. स्वस्थ पाचन तंत्र हे स्वास्थ्याचे मूळ द्योतक आहे. त्याच करिता पुराण धान्य म्हणजे जुने धान्य सेवन हितकर असते.

४) सर्व डाळि मध्ये मुगाची डाळ श्रेष्ठ सांगितली आहे कारण की ती पचायला हलकी असते आणि बारा महिने सेवन योग्य असते. मुगाची डाळ सेवन करत असताना ती सेंद्रिय असल्याची खात्री करून घ्यावी ती हायब्रीड नको. मुगाची डाळ सालीसकटच खावी तसेच ती देखील एक वर्ष जुनी असलेली खावी.


                   पथ्य विहार

विहार म्हणजेच प्रवृत्ती (ऍक्टिव्हिटी) . अर्थातच असे कर्म जे शरीराला उपकारक ठरतील.

      त्वचारोग असो अगर नसो अथवा झाल्यानंतर त्यांना ठीक होण्यासाठी काय काय करावे हे माहीत करून घेण्यासाठी आयुर्वेदात सरळ सरळ असे कोणतेही संदर्भ नाही. त्वचारोगांच्या कारणांचे वर्णन मात्र आयुर्वेदात आहे. या कारणांचे टाळणे पथ्यविहार मध्ये समाविष्ट होऊ शकते.

१) नियमित हलक्या गरम पाण्याने दिवसातून एक अथवा दोन वेळा स्नान करावे. अंग रखरखीत रूमालाने हळुवार रगडून सुकवावे.

२) नियमित तीळ तेल नारळ तेल अथवा औषधी गुणांनी सिद्ध तेलाने शरीराची मालिश करावी. याने शरीराची त्वचा कोमल तसेच व्याधीक्षम बनते.

३) आंघोळ करीत असताना साबण शाम्पू यांचा वापर करण्यापेक्षा आयुर्वेदात उल्लेख असलेल्या उटणे , शिकेकाई, रिठा, त्रिफळा, तुरटी कालचा वापर करावा. यामुळे शरीरावर चा मळ तर निघतोच त्वचा सुदृढ आणि कांतीमान होते.

४) त्वचा कोमल राहण्यासाठी आज-काल पेट्रोलियम जेली चा उपयोग करण्यात येतो. याचा उपयोग शक्यतो अजिबात करू नये. पेट्रोलियम जेली च्या उपयोगाने त्वचेचे व्याधीक्षमत्व खूपच कमी होऊन जाते . परिणाम स्वरूप छोटे छोटे त्वचारोग देखील लवकर ठीक होत नाही.

५) सदैव सुती कापडाची शिवलेली कपडे वापरावीत. सिंथेटिक धाग्यांनी बनलेली कपडे वापरू नयेत.

६) खूप जास्त उन्हात फिरू नये तसेच खूप थंडी शरीर उघडे राहील असे कपडे घालू नये.

७) बाहेरून घरात आल्यावर थोडा वेळ थांबून शक्यतो पुन्हा हलक्या कोमट पाण्याने अंघोळ करावी.

८) आठवड्यातून एकदा का होईना आंघोळीच्या आधी बाष्प स्वेद (स्टीम बाथ) घ्यावा. बाष्पस्वेद घेतल्याने स्वेद ग्रंथींची छिद्रे उघडून  त्यातील संचित मळ निघून जातो आणि त्वचा  स्वस्थ राहते.

 या नियमांचे पालन त्वचेला स्वस्थ राखते. तरीसुद्धा त्वचारोग झाल्यास वरील नियमांचे पालन केल्याने ते लवकर बरे होतात. पुढील भागामध्ये या लेखाचा दुसरा अंक पाहूया. धन्यवाद.


डॉ सुशांत शशिकांत पाटील,आयुर्वेदाचार्य :BAMS DYA सर्वद आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय, विद्या नगर, भुसावळ रोड, नवीन नगर पलिके जवळ,फैजपूर .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.