जावयाने सासूचा खून केल्याचे उघड
जावयाने सासूचा खून केल्याचे उघड
जळगाव जामोद वृत्तसंस्था -तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील एका पासष्ट वर्षीय महिलेचा तिच्याच घरात मृतदेह आढळून आल्याची घटना २७ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली होती. हा खून दारुड्या जावयानेच केल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतू या खून प्रकरणातील आरोपी जावाई फरार होण्यात यशस्वी झाला आहे. तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील गयाबाई बाबुराव पडोळ (६५) या महिलेच्या चारही मुलीचे लग्न झाले आहे. त्यापैकी वनिता नामक मुलगी ही आपल्या पतीसह गावातच आईच्या घरापासून काही अंतरावर राहात होती. त्यामुळे वृध्द महिला ही घरात एकटीच राहात होती. मुलगी वनिता हिला तिचा पती दारु पिऊन मारहाण करत असे. त्यामुळे वृध्द महिलेने जावयास खडे बोल सुनावले होते.
याचाच राग मनात ठेऊन जावाई सुभाष सुरशिंग बागुल रा. तिघ्रा ता. मलकापूर हा २६ जानेवारीच्या रात्री दारुच्या नशेत वृध्द महिलेच्या घरी गेला. त्यानंतर सासु जावयात पुन्हा उपरोक्त कारणावरून वाद झाला. यावेळी रागाच्या भरात जावाई सुभाष बागुल याने वृध्द सासूचा हाताने गळा आवळून खुन केला. त्यानंतर तो करातुन पसार झाला. दुसर्या दिवशी सकाळी वृध्द महिलेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आला होता.
या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवुन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात हलविला. खुनाचा तपास करण्यासाठी श्वान पथकास देखील पाचारण करण्यात आले होते. दरम्यान काल शुक्रवारी रात्री उशिरा संतोष गुलाबसिंग उशिर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कैलास चौधरी हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत