Contact Banner

न्हावी येथे केळी घड चोरणाऱ्या दोघांना अटक

Barber-here-banana-stealing-two-arrested


 न्हावी येथे केळी घड चोरणाऱ्या दोघांना अटक 

 लेवाजगत न्यूज न्हावी -यावल‎ तालुक्यातील न्हावी शिवारात खरड‎ रस्त्यावरील शेतातून टाटा मॅजिक‎ वाहनातून केळीचे झाड कापून‎ चोरून नेताना दोघांना पकडले.‎ याप्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात‎ दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.‎ न्हावी येथील शेतकरी नीलेश‎ एकनाथ वाघुळदे यांनी फिर्याद‎ दिली. त्यात त्यांनी न्हावी‎ शिवारातील खरड रस्त्यावर शेत‎ (गट क्रमांक २२९१) बटाईने केले‎ आहे. 

    तेथे त्यांनी केळी लागवड‎ केली होती. त्यांच्या शेतातून बाळू‎ कडू तायडे (वय ५२) व कुंदन‎ सुरेश तायडे (वय ३७, रा.न्हावी) हे‎ दोघे वाहनातून (एमएच‎ ०४-ईबी.४७७९) ७,८०० रुपयांच्या‎ केळीचे ४० घड चोरून नेत होते.‎ त्यांच्याविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल‎ झाला. तपास एपीआय सिद्धेश्वर‎ आखेगावकर यांच्या‎ मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक महेंद्र‎ महाजन करत आहे.‎

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.