Contact Banner

डॉ. नि.रा.पाटील लिखित खान्देश व वऱ्हाडातील लेवा पाटीदार समाजः एक अन्वयार्थ पुस्तकाचे प्रकाशन, डॉ.नारखेडे, वाघुळदे व कोल्हे यांचा झाला विशेष गौरव ...!!

 

डॉ. नि.रा.पाटील लिखित खान्देश व वऱ्हाडातील लेवा पाटीदार समाजः एक अन्वयार्थ पुस्तकाचे प्रकाशन,  डॉ.नारखेडे, वाघुळदे व कोल्हे यांचा झाला विशेष गौरव ...!!

डॉ. नि.रा.पाटील लिखित खान्देश व वऱ्हाडातील लेवा पाटीदार समाजः एक अन्वयार्थ पुस्तकाचे प्रकाशन,

डॉ.नारखेडे, वाघुळदे व कोल्हे यांचा झाला विशेष गौरव ...!!

                                                                      लेवाजगत न्यूज नागपूर : येथील रामनगर येथे भ्रातृ मंडळ च्या वतीने   सुप्रसिद्ध इतिहासकार ,संशोधक ,साहित्यिक  डॉ. नि. रा. पाटील व सह-लेखिका सौ. उर्मिला निळकंठ पाटील लिखीत लेवा पाटीदार समाजः एक अन्वयार्थ तसेच नागपूर येथील लेखिका  सौ. अलका बोंडे, लिखीत रेशीमबंध या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा नागपूर येथील कै.लक्ष्मीबाई पाटील सभागृहात डॉ. डी. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव शहराचे आमदार राजुमामा भोळे यांच्या हस्ते व यवतमाळ येथील सुप्रसिध्द साहित्यिक  डॉ. प्रा. रमाकांत कोलते,  परतवाडा येथील  प्रा. डॉ. काशिनाथ बऱ्हाटे , डॉ. प्रमोद महाजन व भ्रातृ मंडळ उपाध्यक्ष  प्रा. बी. एन. पाटील यांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण झाला. 

       कार्यक्रमाला फैजपूर या ऐतिहासिक शहरात संपन्न झालेल्या तिसऱ्या लेवा गणबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अरविंद कृष्णा नारखेडे, जळगांव येथील प्रसिध्द पत्रकार कलावंत व लेवा गणबोली संमेलनाचे मुख्य आयोजक  तुषार वाघुळदे, भ्रातृ मंडळ, अमरावतीचे अध्यक्ष  सुरेश भारंबे व जळगांव येथिल प्रसिध्द चित्रकार  लिलाधर कोल्हे आवर्जून उपस्थित होते.त्यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.

       डॉ.नि.रा.पाटील यांचा लेवा गणबोली साहित्य मंडळातर्फे विशेष मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.. तसेच चित्रकार कोल्हे यांनी अध्यक्ष डी. एन. पाटील यांचे चितारलेले स्केच सप्रेम भेट दिले..


          मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. सौ. आशा बऱ्हाटे व सौ. आशा चौधरी यांनी स्वागतगीताद्वारे पाहुण्यांचे स्वागत केले. भ्रातृ मंडळ नागपूरतर्फे कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्योगपती डॉ. डी. एन. पाटील (अध्यक्ष, भ्रातृ मंडळ, नागपूर), उद्घाटक, श्री. सुरेश दामु भोळे (राजु मामा), लेवा पाटीदार समाजः एक अन्वयार्थ या पुस्तकाचे लेखक सुप्रसिध्द इतिहासकार/लेखक  डॉ. नि. रा. पाटील व सह-लेखिका सौ. उर्मिला निळकंठ पाटील, रेशीमबंध (ललित लेख) या पुस्तकाच्या लेखिका सौ. अलका बोंडे, विशेष अतिथी डॉ. प्रा. रमाकांत कोलते, प्रा. डॉ. काशिनाथ बऱ्हाटे,  प्रमोद महाजन तसेच फैजपूर येथे संपन्न झालेल्या लेवा गणबोली तिसऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मा. डॉ. अरविंद नारखेडे आयोजक कलावंत तुषार वाघुळदे या मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला ,  

          भ्रातृ मंडळ नागपूरचे कार्यवाह श्री. उध्दव नारखेडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण केल्यानंतर उद्घाटक  सुरेश दामु भोळे (राजु मामा)  यांनी उद्घाटनपर भाषण केले, त्यानंतर विशेष अतिथी डॉ. प्रा. रमाकांत कोलते,  प्रा. डॉ. काशिनाथ बऱ्हाटे, डॉ. प्रमोद महाजन यांनी दोन्ही पुस्तकांविषयी विस्तृत माहिती देऊन त्यांचे मनोगत व्यक्त केले. लेवा पाटीदार समाजः एक अन्वयार्थ या पुस्तकाचे लेखक डॉ. नि. रा. पाटील व  रेशीमबंध (ललित लेख) या पुस्तकाच्या लेखिका सौ. बोंडे यांनी  त्यांच्या पुस्तका विषयी लेखकाचे मनोगत व्यक्त केल्यानंतर भ्रातृ मंडळ, नागपूरचे अध्यक्ष डॉ. डी. एन. पाटील यांचे अध्यक्षीय भाषण झाले. भ्रातृ मंडळ, नागपूरचे कोषाध्यक्ष  पद्माकर पाटील यांनी आभार मानल्यानंतर सौ. आशा बऱ्हाटे व सौ. आशा चौधरी यांच्या सुरेल आवाजामध्ये पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता केली.

          कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. प्रणिता नारखेडे यांनी केले. सौ. दीपाली राणे व सौ. सुनंदाताई नेमाडे यांनी कार्यक्रमास मदत केली.

        त्यानंतर कार्यक्रमाचे अन्नदाते डॉ. डी. एन. पाटील यांच्याकडून स्वादिष्ट सुरुची भोजन देण्यात आले.उपस्थित समाज बांधवांनी स्नेह भोजनाचा आनंद घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.