म्हैस बांधण्याच्या वादातुन युवकाचा खुन ! वरुड येथील कुरेशी पुर्यातील घटना!
म्हैस बांधण्याच्या वादातुन युवकाचा खुन !
वरुड येथील कुरेशी पुर्यातील घटना!
लेवाजगत न्युज वरुड:- (निलेश लोणकर ) स्थानिक कुरेशी पुरा येथील दोन शेजाऱ्यामध्ये म्हैस बांधण्यावरून मंगळवारला सकाळी आठ वाजता वादविवाद झाला. वादाचे रूपांतर भांडणांमध्ये होऊन आरोपीने मृतकाच्या छातित चाकू भोकसून दुचाकीने पळून गेला.तर दुसरा पायदळ गेला.हि माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही आरोपीना ताब्यात घेतले.पोलिसांनी वेळीच पोलीस ताफ्यासह घटनास्थळ गाठले. म्रितकाळ ग्रामीण रुग्नालयात आणण्यात येऊन शवविच्छेदन कारणात आले तर मृतकाच्या नातेवाईकाने दिलेल्या तक्रारीवरून दोन सख्ख्या भावाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे .
प्राप्त माहितीनुसार गब्बर उर्फ शफिक शाह रफीक शाह २८रा.कुरेशी मोहल्ला वार्ड क्र.२० वरूड असे म्रितकाचे नाव तर आरोपी सरदार खान रशिद खान २६ ,नदीम खान रशिद खान ३२ दोन्ही रा.कुरेशी मोहल्ला वार्ड क्र.२० वरुड असे आहे.आरोपी मृतक यांच्यात घराच्या भिंतीलगत म्हैस बाधण्याच्या किरकोळ वाद झाला.फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी दोन्ही आरोपी सख्खे भाऊ असून म्रिताक आणि आरोपी यांचे शेजारी घर आहे .आरोपीच्या बकऱ्या व म्हैस मृतकाचे नातेवाईकाचे घराजवळ बांधायचा. म्हैस बांधण्याला विरोध केल्यावरसुद्धा तिथेच म्हैस बांधायचा. आवाजाने झोप लागत नसायची. मंगळवार ला सकाळी आठ वाजताच दरम्यान म्हैस बांधण्यावरून वाद होऊन आरोपीने मृतकाच्या मानलेल्या बहीनीला शिविगाळ केल्यामुळे मृतक गब्बर उर्फ शफिक शाह रफीक शाह हा झगड्याचा आवाज आल्यामुळे घटनास्थळावर गेला .त्याने म्हटले की माझ्या बहीनीला शिविगाळ का करत आहे. असे म्हणताच आरोपी सरदार खान रशीद खान याने मृतकाची मान पकडली त्या दोघामध्ये झोंबाझोंबी झाली तेव्हा आरोपीचा माठा भाऊ नदीम खान रशिद खान याने मृतक गब्बर उर्फ रफीक शहा ला शिवीगाळ केली. भांडण सुरू असताना सरदार खानने चाकु काढून मृतकाच्या छातीत मारला व चाकु काढून पाण्याने धुतला व मोटरसायकलने पळून गेला तर त्याचा भाऊ पायदळ गेला. हि माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ दोन्ही आरोपीना पकडले. तर पोलीस पथकाने घटनास्थळ गाठून पडलेला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामिण रुग्णालयामध्ये नेण्यात आला. फीर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही आरोपी विरुद्ध भादवी कलम ३०२,२०४,५०४,३४ अन्वये गुन्हा दाखल करून दोन्ही सख्ख्या भावाना अटक केली आहे.घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकरी निलेश पांडे यांनी भेट दिली असून पुढील तपस ठाणेदार प्रदीप चौगावकर, एपीआय सारिका बागडे , उपनिरीक्षक धीरज राजूरकर सह वरुड पोलीस करीत आहे.
दोन महीण्यानंतर होणार होते लग्न
मृतक गब्बर उर्फ शफीक शाह रफीक शाह याचा साक्षगंध सोहळा आक्टोबर महीण्यामध्ये तालुक्यातील एका गावामध्ये झाला होता. त्यांचा विवाह पुढील महीण्यात होणार असल्याची माहीती संस्थानिकांनी दिली.
फॉरेन्सीक ची टीम घटनास्थळी दाखल
आज सकाळच्या सुमारास शहरामध्ये घडलेल्या हत्त्याकांडाचे घटनास्थळावरील नमुने घेण्यासाठी अमरावती वरून इन्व्हेस्टीकेशन कार युनिट टीमला पाचारण करण्यात आले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत