धनोडी येथे दोन घरे आगीत खाक ! सहा लाखांचे नुकसान !
धनोडी येथे दोन घरे आगीत खाक ! सहा लाखांचे नुकसान !
लेवाजगत न्युज वरूड ( निलेश लोणकर):- तालुक्यातील धनोडी येथील दोन घरांना मध्यरात्री नंतर अचानक आग लागली. दोन्ही घरातील कापूस ,तुरिसह अन्नधान्य राख झाले. यामध्ये सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वरूड आणि शेन्दुरजनाघाट नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले.
प्राप्त माहिती नुसार, धनोडी येथे रविवारच्या मध्यरात्री बारा वाजताचे दरम्यान शेतकरी किसना बेलसरे आणि मनोज बेलसरे यांच्या घराला अचानक आग लागली.यामध्ये बारा क्विंटल कापूस,तीन क्विंटल तुर,घरातील जीवनावश्यक वस्तू ,भांडीकुंडी,कपडे,शाळेचे पुस्तके आगीत जळून खाक झाले.किसना बेलसरे आणि मनोज बेलसरे यांचा परिवार उघड्यावर आला. आग इतकी भयानक होती की घरातील सिलेंडरचा सुद्धा स्फोट झाला. वेळीच ग्रामपंचायत आणि वरूड ,शेन्दुरजना घाट नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून पहाटे उशिरा पर्यंत आगीवर नियंत्रण मिळविले.परंतु एका सिलेंडरचा स्फोट झाल्याने कदाचित अनर्थ घडला असता. यावेळी सरपंच संजय आंडे ,ग्राम सेवक शेख,तलाठी प्रशांत गोरडे,ठाणेदार सतीश इंगळे सह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
सामजिक संघटना, पुढारी कुठे ?
रविवारच्या मध्यरात्री धनोडी येथे आग लागुन घरातील जिवणावश्यक वस्तुची राखरांगोळी झाली. दोण परीवार उघड्यावर आले आहे. त्यांना तालुण्यातील कोणत्याच सामाजीक संघटनेनी आर्थिक किवा जिवणावश्यक वस्तु देण्यासाठी वृत्त लिहिस्तोर कोणतीही मदत देण्यासाठी सामाजीक संघटना , पुढारी मदतीसाठी पोहचल्या नव्हत्या हे मात्र विषेश
कोणत्याही टिप्पण्या नाहीत