पाटचारीत बुडून दहावीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू
पाटचारीत बुडून दहावीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू
लेवाजगत न्यूज साकळी -तालुक्यातील साकळी येथील दहावीच्या विद्यार्थ्याचा गावालगतच्या पाटचारीत बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी घडली. निखिल मुकुंदा सोनवणे ९वय १६) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. यावल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली. साकळी येथील आंबेडकर नगरातील रहिवासी निखिल मुकुंदा सोनवणे हा गावाजवळील हतनूर धरणाच्या पाटचारीकडे गेला होता.पाटचारीत पाणी असल्याने तो पोहण्यासाठी उतरला. पण,पाण्याच्या खोलीचा अंदाजन आल्याने तोबुडाला. त्यात त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच जि.प.चे माजी निखिल सोनवणे आरोग्य सभापती रवींद्र पाटील व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. निखिलला पाटचारीतून काढून साकळी प्राथमिक आरोग्य केंद्र व नंतर यावल ग्रामीण रुग्णालयात आणले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. ऋतम सोनवणे यांच्या माहितीवरून यावल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार सिकंदर तडवी करत आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असून, गावात शोककळा पसरली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत