लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीला गरोदर करून प्रियकर फरार
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीला गरोदर करून प्रियकर फरार
नाशिक वृत्तसंस्था -प्रेमसंबंधानंतर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये मुंबईत राहत असलेल्या २१ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष देत तिला गरोदर करून प्रियकर फरार झाला आहे. प्रियकराने बळजबरीने अंबड परिसरातील एका खासगी हाॅस्पिटलमध्ये तरुणीच्या इच्छेविरुद्ध कुठल्याही कागदपत्रावर सह्या न घेता गर्भपात केला. याप्रकरणी संशयित प्रियकर आबिद सदरुद्दीन कोकणी (रा. त्र्यंबकेश्वर) व त्याची आई, भावाच्या विरोधात नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. माहितीनुसार, पीडितेची आई वारल्यानंतर वडिलांनी दुसरे लग्न केल्यानंतर ती मावशीकडे पुणे रोड परिसरात राहते. १२ वी शिकलेली तरुणी दोन वर्षापासून मुलींच्या होस्टेलमध्ये वास्तव्य करत खासगी नोकरी करते. येथे तिची आरोपीशी ओळख झाली. दोघांनी लग्न करण्याचे ठरवल्यानंतर संशयिताने खडावली येथे भाड्याने रूम घेतली. दोघे लिव्ह इनमध्ये होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत