Contact Banner

अर्थ संकल्पात गुरव समाजासाठी महामंडळाची घोषणा; ५० कोटी रुपयांची तरतूद राष्ट्रीय अध्यक्ष मा.आ.विजयराज शिंदे यांच्यासह बुलडाण्यात गुरव समाज बांधवांच्या वतीने अर्थसंकल्पाचे जल्लोशात स्वागत

 

अर्थ संकल्पात गुरव समाजासाठी महामंडळाची घोषणा; ५० कोटी रुपयांची तरतूद    राष्ट्रीय अध्यक्ष मा.आ.विजयराज शिंदे यांच्यासह बुलडाण्यात गुरव समाज बांधवांच्या वतीने अर्थसंकल्पाचे जल्लोशात स्वागत

अर्थ संकल्पात गुरव समाजासाठी महामंडळाची घोषणा; ५० कोटी रुपयांची तरतूद


राष्ट्रीय अध्यक्ष मा.आ.विजयराज शिंदे यांच्यासह बुलडाण्यात गुरव समाज बांधवांच्या वतीने अर्थसंकल्पाचे जल्लोशात स्वागत


 लेवाजगत न्यूज शिवश्री बी एम गुरव बुलडाणा:- राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांनी आज सभागृहात राज्याचा सर्व समावेशक अर्थसंकल्प सादर केला.या अर्थ संकल्पात गुरव समाजाच्या उन्नतीसाठी महामंडळ स्थापण करण्याची घोषणा करून या महामंडळास प्राथमिक स्वरूपात ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची घोषणा केली आहे.याची घोषणा होताच आज दि.९.०३.२०२३ रोजी बुलडाणा येथील गुरव समाज बांधवांनी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.आ.विजयराज शिंदे यांच्यासह जनसंपर्क कार्यालय शिवालय येथे फटाके फोडून जल्लोष व्यक्त केला व सरकारच्या समर्थनार्थ घोषणा बाजी करीत अर्थसंकल्पाचे स्वागत केले.

   राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या वतीने सोलापूर येथे सोलापूर येथे म्हासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.आ.विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात भव्य दिव्य महाधिवेशन घेण्यात आले होते.या अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे , उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब ,महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील,माजी मुख्यमंत्री श्री सुशीलकुमारजी शिंदे यांच्यासह खासदार, आमदार यांचीही उपस्थिती होती.या अधिवेशनात मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांनी गुरव समाजाच्या उन्नती साठी संत काशीबा महाराज गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा करून त्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद सुद्धा जाहीर घोषनेत केली होती.

त्याचीच वचनपूर्ती म्हणून आज राज्याचे अर्थ मंत्री तथा उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी राज्याचा अर्थ संकल्प मांडला व त्यात गुरव समाजासाठी "संत काशीबा महाराज युवा गुरव आर्थिक विकास महामंडळ" स्थापनेची व त्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतुदीची सभागृहात घोषणा करून गुरव समाजाच्या विकासाचे एक दालन खुले केले आहे.

   या निमित्त राष्ट्रीय गुरव समाज म्हासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाजपा नेते मा.आ.विजयराज शिंदे व गुरव समाज बांधवांनी शिवालय येथे एकत्र येऊन फटाके फोडून जल्लोष व्यक्त केला तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.आ.विजयराज शिंदे यांचे आभार व्यक्त केले.

      माजी आमदार विजयराज शिंदे यांनीही अर्थसंकल्पाचे स्वागत करत गुरव समाजाच्या उन्नतीसाठी जी भरीव मदतीची घोषणा केली त्याबद्दल तमाम समाज बांधवांच्या वतीने शिंदे - फडणवीस सरकारने जाहीर आभार व्यक्त केले.

    यावेळी शिवालयात प.पू.अनंत महाराज चिंचोळकर, श्री दत्ता शिंदे, श्री संजय सपकाळ,श्री पांडुरंग कावळे ,भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री विश्राम पवार, श्री अण्णा पवार, शाहीर खांडेभराड, शाहीर प्रमोद दांडगे, रवी चिंचोळकर, विजय चिंचोळकर, श्री दुर्गेश चिंचोळकर,मिलिंद चिंचोळकर,प्रा विजय मोरे, सचिन चिंचोळकर, सुमित चिंचोळकर,सौ मिनाक्षी चिंचोळकर,सौ कावळे ताई,सौ उषाताई चिंचोळकर, सौ मीना चिंचोळकर, सौ आरती सपकाळ,सौ वंदना सपकाळ,सौ प्रतिभा शिंदे, सौ प्रणिता चिंचोळकर, सौ सारिका चिंचोळकर, सौ योगिता चिंचोळकर, अविनाश शेंडे, पवन शिंदे,सुदर्शन कांबळे,सुदर्शन पाटील,दीपक चौटकर, ऋषिकेश गोरे,बाळू ठाकरे,किरण नाईक यांसह  भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व गुरव समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.