राष्ट्रवादीच्या विधानपरिषदेतील गटनेतेपदी एकनाथराव खडसे
राष्ट्रवादीच्या विधानपरिषदेतील गटनेतेपदी एकनाथराव खडसे
लेवाजगत न्यूज मुंबई -राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विधानपरिषदेतील गटनेतेपदी ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विधानपरिषदेतील गटनेतेपदी एकनाथराव खडसे तर प्रतोदपदी अनिकेत तटकरे यांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी पक्षातर्फे पत्र विधानपरिषदेच्या अध्यक्षा निलम गोर्हे यांना प्रदान करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत सुरू असलेल्या चर्चेवर यामुळे शिक्कामोर्तब झाले आहे.
एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आमदारकीसाठी दीर्घ काळ वाट पहावी लागली होती. तर आमदारकी मिळताच राज्यातील महाविकास आघाडीचा सत्ता गेली होती. यामुळे एकनाथराव खडसे यांची दुसरी इनिंग संभ्रमाच्या वातावरणात होती. यावरून त्यांचे विरोधक हे नेहमीच खडसे यांची खिल्ली उडवतांना दिसून येतात. या पार्श्वभूमिवर, आता त्यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी अधिकृतपणे निवड झाल्याने ते पुढील काळात अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत