Contact Banner

९ वर्षाच्या "इन्स्टा" क्वीनची गळफास घेत आत्महत्या

 

९ वर्षाच्या "इन्स्टा" क्वीनची  गळफास घेत आत्महत्या

९ वर्षाच्या "इन्स्टा" क्वीनची  गळफास घेत आत्महत्या 

वृत्तसंस्था तामिळनाडू -तामिळनाडूच्या पेरियाकुप्पममध्ये एक वेदनादायी घटना घडली आहे. येथील एका ९ वर्षीय मुलीने किरकोळ कारणावरून गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. आई-वडिलांनी अभ्यास करण्याचा तगादा लावल्यामुळे प्रतीक्षा नामक मुलीने हे टोकाचे पाऊल उचलले. या ९वर्षीय मुलीला तिचे शेजारी 'इन्स्टा क्वीन' म्हणत.

    प्रतीक्षाचे वडील कृष्णमूर्ती यांनी आपल्या मुलीला आपल्या सासुरवाडीजवळ खेळताना पाहिले होते. त्यानंतर त्यांनी घरी जाऊन तिला अभ्यास करण्याची सूचना करून घराची चावी सोपवली.

    त्यानंतर ते आपल्या दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी निघून गेले. रात्री ८.१५ च्या सुमारास ते आपल्या घरी परतले असता त्यांना घर आतून बंद असल्याचे आढळले. त्यांनी आपल्या मुलीला दरवाजा उघडण्यास सांगितले. पण प्रतीक्षाने त्यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे कृष्णमूर्ती घाबरले. त्यांनी घरामागील खिडकी तोडून आत प्रवेश केला असता त्यांची मुलगी गळ्यात टॉवेल अडकवून लटकल्याचे व तडफड करत असल्याचे दिसून आले. हे पाहून त्यांच्या पायाखालील वाळू सरकली. ते तत्काळ तिला घेऊन रुग्णालयाच्या दिशेने धावले. पण दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.