रामनवमीच्या दिवशी इंदूर मध्ये मोठी दुर्घटना मंदिराच्या विहरीचे छत कोसळले,25 लोक पडल्याची भीती
रामनवमीच्या दिवशी इंदूर मध्ये मोठी दुर्घटना मंदिराच्या विहरीचे छत कोसळले,25 लोक पडल्याची भीती
लेवाजगत न्यूज इंदूर-मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये रामनवमीच्या दिवशी मोठी दुर्घटना घडली आहे. श्री बेलेश्वर महादेव झुलेलेलाल मंदिरातील 40 फूट खोल विहिरीचे छत कोसळल्याने 25 हून अधिक लोक विहिरीत पडले. यामध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचा समावेश आहे. पोलिस आणि भाविकांनी दोरीने लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. 18 जणांना बाहेर काढण्यात आले आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना एका हवनाच्या वेळी घडली. विहिरीच्या छतावर 25 हून अधिक लोक बसले होते. वजन जास्त झाल्याने छत तुटले आणि लोक खाली पडले. जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त आणि इतर प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत