प्रेमीयुगलाची व्हिडीओ कॉल करीत आत्महत्येचा प्रयत्न तरुणीचा मृत्यू
प्रेमीयुगलाची व्हिडीओ कॉल करीत आत्महत्येचा प्रयत्न तरुणीचा मृत्यू
वृत्तसेवा नागपूर -कुटुंबातून लग्नाला विरोध असल्याने वर्धा नदीच्या काठावरील नायगाव घुग्घुस येथील प्रेमीयुगुलाने व्हिडीओ कॉल करीत उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात तरुणीचा मृत्यू झाला तर तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राप्त माहितीनुसार, रहिवासी राकेश जेणेकर (27) उपचार घेत असून शुभांगी भोंगळे (24) तरुणीचा मृत्यू झाला .दोघेही एकाच गावातील रहिवासी असून राकेश व शुभांगी या प्रेमीयुगलाचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र दोघांच्याही लग्नाला घरून विरोध होता. त्यामुळे दाेघांनीही विष प्राशन करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मुलीचा मृत्यू झाला तर मुलगा गंभीर अवस्थेत खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे आत्महत्येचा हा प्रयत्न व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून करण्यात आला होता. शहरातील गांधीनगर निवासी राकेश जेणेकर व रामनगर येथे राहणारी शुभांगी भोंगळे हे दोघे प्रियकर प्रेयसी असल्याची माहिती आहे. दुपारी दोघांनी एकमेकांना व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संपर्क साधत उंदीर मारण्याचे औषध प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला.
आत्महत्येच्या प्रयत्नानंतर कुटुंबीयांनी तत्काळ तरुणीला रुग्णालयात नेले. मात्र, अत्यवस्थ मुलीचा मृत्यू झाला. तर राकेश हा श्वेता हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. आत्महत्येमागील अन्य ठोस कारणे अजून अस्पष्ट आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे घुग्घुस पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आसिफराजा शेख यांनी सांगितले. दरम्यान तरुणावर मोठ्या प्रमाणात कर्ज झाले होते. त्यातून दोघांमध्ये वाद झाला होता अशीही माहिती समोर येत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत