नागरिक आणि पोलिसांच्या मुळे अनर्थ टळला ! बर्निग कार !
नागरिक आणि पोलिसांच्या मुळे अनर्थ टळला !
बर्निग कार !
लेवाजगत वरूड :- स्थानिक एक दांपत्य हुंदाई कारने वरूड ला येत असताना साइसहवास कॉलनी जवळ महामार्गावर चालत्या कार मधून धूर निघू लागला. पतीपत्नीने स्वतःचा बचाव करीत बाहेर निघाले. येणाऱ्या लोकांनी थांबून इंजिन बंद केले. तर अग्निशमन दलाला फोन केला मात्र फोनच बंद होता तर पोलीस पोहचले. पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने निघणारा धुर बंद झाला आणि संभाव्य अनर्थ टळला. स्थानिक महामार्गावर मंगळवार दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान अमरावती वरून वरूड ला दांपत्य हुंदाई कार ने येत होते. साइ सहवास कॉलनी जवळ अचानक गाडीतून धुर निघाला. यावेळी गाडीतील पतीपत्नी बाहेर निघाले. थोड्याच वेळात इंजिनचे तापमान वाढल्याने मोठ्या प्रमाणात धुर वाढला तर इंजिन सुरूच होते. यावेळी स्थानिक नागरिकांनी मदतीला जाऊन गाडीतील सामान बाहेर काढले. तर गाडीतून मोठ्या प्रमाणावर धुर निघत पाहून नागरिकांनी अग्निशमन दलाला लँड लाईन वर फोन केला तर फोन बंद असल्याचे सांगण्यात आले. काहींनी पोलिसांना ११२ क्रमांकावर मात्र फोन लावताच क्षणार्धात पोलिसांचे वाहन पोहचले. नागरिक ललित घोरमाडे ,शिक्षक प्रमोद यावलकर ,पत्रकार प्रकाश गडवे आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी यांनी धुर निघत असताना इंजिन बंद केले. आणि संभाव्य अनर्थ टळला. मात्र अग्निशामक ला फोन लागला नाही.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत