मुलींनी दिला आईच्या चितेला अग्नीडाग!
मुलींनी दिला आईच्या चितेला अग्नीडाग!
लेवाजगत न्यूज वरूड :- येथील माजी नगरसेवक तथा भाजपा नेते उमेश उर्फ चंदू यावलकर यांच्या पत्नी अस्मिता यांचे अल्पशा आजाराने शनिवारी मध्यरात्री निधन झाले होते. यांना दोनच मुली असल्याने दोन्ही मुली अंत्ययात्रेत सहभागी होऊन केदारेश्वर मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परंपरेला फाटा देत दोन्ही मुलींनी आईच्या चितेला चिताग्नि दिला.
स्थानिक रिंग रोड परिसरातील माजी नगरसेवक तथा भाजपा नेते उमेश उर्फ चंदू यावलकर यांच्या पत्नी अस्मिता यांचे अल्पशा आजाराने शनिवारी मध्यरात्री निधन झाले होते.यांचे पश्चात पारुल आणि आयुषी या दोनच मुली असुन यातील पारुल ही विदेशात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तृतिय वर्षाला तर आयुषी अकरावीला आहे. रविवारी दुपारी बारा वाजता केदारेश्वर मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भाऊ नसल्याने मातृछत्र हरविलेल्या दोन्ही मुलींनी सामाजिक परंपरेला फाटा देत आईच्या चितेला चिताग्नि देऊन सोपस्कार पार पाडले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत